नार्वेकर विधानसभा अध्यक्षाच्या खुर्चीवर किती दिवस बसणार? सुनील प्रभूंचा सवाल

shivsena mla sunil prabhu on vidhan sabha president rahul narvekar and devendra fadanvis

महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींनंतर अखेर शिंदे – फडणवीस नवं सरकार स्थापन झालं. यानंतर आज विधानसभेच्या दोन दिवशीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचे राहुल नार्वेकर हे 164 मतांनी विजयी झाले. यावेळी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठारावावेळी बोलताना शिवसेनेचे नेते सुनील प्रभु यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. आमचा व्हीप झुगारून 39 सदस्यांनी मतदान केले आहे. त्यामुळे किती दिवस राहुल नार्वेकर किती दिवस अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसतील सांगता येत नाही. असं सुनील प्रभु म्हणाले आहे.

राहुल नार्वेकर तरुण अध्यक्ष म्हणून गौरव आहे. आधी तुम्ही शिवसेनेत होता, त्यानंतर राष्ट्रवादीत गेलात, नंतर भाजपमध्ये गेलात. कायद्याचा तुमचा अभ्यास पाहता तुम्ही कायदामंत्री व्हाल, असं वाटलं होतं. पण दुर्दैव आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नशिबाचे फेरे कधीही फिरू शकतात. ज्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो, त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. कायदामंत्री म्हणून पाहत होतो, त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यामुळे आमचं दुःख विसरून, आम्हाला मित्र म्हणून देवेंद्रजी यांच वाईट वाटतयं, अशी मिश्लिक टिपण्णी देखील सुनील प्रभु यांनी केली आहे.

आपण अध्यक्ष होत असताना या सदनात आमचा व्हीप झुगारून ३९ सदस्यांनी या व्हीपच्या विरोधात मतदान केलं, लोकशाहीची पायमल्ली केली हे देखील इतिहास कधी विसरणार नाही. त्यामुळे याची देखील खंत ही संपूर्ण विधीमंडळाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असेल, हे देखील या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. ३९ सदस्यांनी जो व्हीप मोडून मतदान केलं आहे, त्यामुळे या संपूर्ण विधीमंडळाचा कार्यकाल किती काळ असेल आणि त्या खुर्चीवर आपण कितीकाळ बसाल या बद्दलची शंका देखील राज्याच्या जनतेला आहे हे दुर्दैवाने मला या ठिकाणी नमूद करावसं वाटतं.

आपल्या बद्दलचा जो मान, सन्मान आणि लोकशाही पद्धतीने आपल्याला असलेला अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर या विधीमंडळातील सत्ता पक्षाचे आणि विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित कराल, असा विश्वास आम्हाला आहे. त्यामळे ज्या अतिउच्च स्थानावर आपण बसलात, त्या ठिकाणी बसल्यानंतर योगायोग असा आहे, की आपण ज्या स्थानावर बसला आहात त्याच्या बरोबर समोरच्या स्थानावर आम्ही बसलो आहोत. त्यामुळे आमच्याकडे आपलं जास्त लक्ष असेल, कारण आपण पूर्वीचे आमचे नैसर्गिक मित्र होता आणि त्यामुळे आम्हाला जास्त न्याय देण्याचा प्रयत्न कराल, असा विश्वासही सुनील प्रभु यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर यांची निवड झाली. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडले, यावेळी शिरगणतीमध्ये राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपच्या राहुल नार्वेकरांना 164 मत मिळाली तर त्यांच्याविरोधी शिवसेनेचे राजन साळवी यांनी केवल 107 मत पडली. या निवडणूक समाजवादी पार्टी आणि एमआयएमच्या 3 आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार अनुपस्थित होते. आज विधानसभा अध्यक्ष पदावर भाजपच्या नार्वेकरांनी बाजी मारली. आता उद्याच्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणीत अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. सोमवारी अधिवेशनात शिंदे- फडणवीस सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्यामुळे या बहुमत चाचणीकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.


 

शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी नाही; पक्षाचं स्पष्टीकरण