रत्नागिरीकरांचे वैदयकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार – उदय सामंत

Uday Samant

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोरे नेते उदय सामंत यांना सुखद धक्का दिला आहे. रत्नागिरीकरांचे वैदयकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार, अशा प्रकारच ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे. उदय सामंत यांनी ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. हे महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार उदय सामंत यांनी केली होती. मात्र, ही मागणी आता शिंदेंच्या निर्णयामुळे पूर्ण होणार आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

रत्नागिरी जिल्ह्याच्यासरकारी वैदयकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार, पुढच्या वर्षी होणार कॉलेज मध्ये प्रवेश, रत्नागिरीकरांचे वैदयकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होऊन आरोग्य सुविधेत होणार आमूलाग्र बदल,मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वैद्यकीय विभागाला आदेश, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. अशा प्रकारचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी शपथविधीनंतर केलं. महाराष्ट्रात एकक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदार संघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे, असं शिंदे म्हणाले होते. त्यानुसार आता मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा : शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री अशक्य, नव्या सरकारबाबत ठाकरेंची ठाम भूमिका