घरठाणेखरा वारसा कोण चालवतंय? जनता निवडणुकीतून दाखवेल, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

खरा वारसा कोण चालवतंय? जनता निवडणुकीतून दाखवेल, शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Subscribe

ठाणे : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली ठाण्याचा विकास झाल्याने विकास कोणाच्या नेतृत्वाखाली झाला आहे. हे पाहणे देखील महत्वाचे आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच स्व.आनंद दिघे कोणाच्या हृदयात आहेत ते लवकरच समजेल, नुसता फोटो लावून होत नाही फोटो हे काल्पनिक असतात. मात्र खरा वारसा कोण पुढे नेत आहेत हे लवकरच जनताच निवडणुकीत दाखवुन देईल, असे प्रतिपादन ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी करत, त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हानच दिले.

शुक्रवारी ठाण्यातील खारकर आळी येथील शक्तीस्थळावर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिघें यांना अभिवादन करण्यासाठी खासदार राजन विचारे तसेच स्व. दिघे यांचे पुतणे व शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर आणि महिला आघाडीच्या नेत्या अनिता बिर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.
शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे गट असे चित्र निर्माण झाले आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर पकड आहे. त्यातच शुक्रवारी शक्तीस्थळावर ठाकरे गटाच्या माध्यमातुन खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे.

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना राजन विचारे म्हणाले की, दिघे साहेब यांच्या आशीर्वादामुळेच आमच्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्ता मोठ्या पदापर्यंत पोहोचला आहे, तो त्यांच्यामुळेच. दिघे हे चार अक्षरांसाठी शेवटपर्यंत जगले असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे यांच्यावर टीका केली. शिवसेनेला पहिली सत्ता ही ठाण्याने दिलेली आहे आणि ठाणेकर हे सुज्ञ आहेत त्यामुळे ते योग्य तोच निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांना अभिवादन करण्यासाठी आता जे काही घडलेलं आहे जे काही झालेलं आहे ते कोणत्याही शिवसेनेकाला पटलेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते उघड्या डोळ्यानी लोक बघत आहेत त्यामुळे त्याचा हिसाब किताब ही जनताच करेल.असेही शेवटी विचारे म्हणाले.


हेही वाचा : ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप परवानगी देण्याचा वेग वाढला, मंडळांची संख्याही वाढली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -