घरमहाराष्ट्रमी शिंदे गटात प्रवेश केला नाही; मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर राजेंद्र गावितांची प्रतिक्रिया

मी शिंदे गटात प्रवेश केला नाही; मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर राजेंद्र गावितांची प्रतिक्रिया

Subscribe

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी देखील तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांचा एकनाथ शिंदे गटाला पाठींबा असल्याचा दावा शिंदे समर्थक आमदारांकडून केला जातोय. याचदरम्यान शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर खासदार गावित शिंदे गटात सामिल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळाात सुरु झाली आहे. यावर राजेंद्र गावित यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण शिंदे गटात प्रवेश केला नसल्याचा खुलासा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची फक्त सदिच्छा भेट घेतल्याचे राजेंद्र यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्या मतदारसंघातील एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक गावांसोबत रस्तेच जोडलेले नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला नाही. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने कोणत्याही पक्षातील लोकप्रतिनिधी त्यांना भेटू शकतात. अस स्पष्टीकरण गावित यांनी दिले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेनेचा वापर करुन माधुकरी मागू नका; राऊतांचा शिंदे गटाला इशारा

माझ्या मतदार संघातील कामे करुन घेण्यासाठी त्यांना भेटलो. माझ्या मतदारसंघातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. पण मी फक्त सदिच्छा भेट देण्यासाठी गेलो होतो. असही गावित म्हणाले आहेत. दरम्यान पालघर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी भेट घेतल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विटरद्वारे दिली आहे.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील वसई – विरार महानगरपालिकेतील ५, #विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, #मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अंतिम प्रमाण मानून तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकृत करून युती सरकारला आपला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : उगवत्या सूर्याच्या साक्षीने घेतलेले निर्णय, फडणवीसांची ठाकरे सरकारवर खोचक टीका

यासोबतच वसई तालुका आणि बोईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये यांनीही हाच निर्णय घेतला आहे. या सगळ्यांच्या साथीने शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली आहे.

याप्रसंगी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, माजी पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा तसेच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते. अशी फेसबुक पोस्ट एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी देखील तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.  मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोक भेटायला येत असतात. राजेंद्र गावित फक्त मला भेटायला आले होते. ते अजून शिंदे गटात आलेले नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.


सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार लांबवण्यात काय अर्थ?, अजित पवारांचा सवाल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -