घरमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या अडचणी काही संपेना! 'या' दिवशी होणार आता जामिनावर सुनावणी

संजय राऊतांच्या अडचणी काही संपेना! ‘या’ दिवशी होणार आता जामिनावर सुनावणी

Subscribe

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही. राऊतांच्या जामीन अर्जावर आज पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली. मात्र कोर्टाने आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊतांना 9 नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच रहावे लागणार आहे. (shivsena mp sanjay raut bail application hearing on 9 november goregaon patra chawl scam)

गुरुवारी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यापूर्वी खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर होणार असल्याची शक्यता होती. मात्र ही शक्यताही आता संपली आहे. राऊतांच्या जामिनाबाबत आज ईडीने न्यायालयात लेखी उत्तर सादर केले. यानंतर न्यायालयाने त्यांच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी ईडीने 30 जून 2022 रोजी अटक केली होती, तेव्हापासून राऊत कोठडीत आहेत. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामिनावर एकाच दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीवेळी त्यांचे कुटुंबीय देखील कोर्टात हजर होते.

- Advertisement -

संजय राऊत यांच्या अटकेपासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष वाढताना दिसतोय. अशा परिस्थितीत खासदार संजय राऊतांनी सुनावणीवेळी कोर्टात जाताना माध्यमांसमोर या संघर्षाबाबत अनेक विधाने केली आहेत. ज्यामुळे राजकीय वाद उफाळून आला, अशा परिस्थितीत संजय राऊत यांना प्रसार माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. आर्थर रोड तुरुंगाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

काय आहे पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा?

महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गोरेगाव पत्राचाळींमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना फ्लॅट देण्याची सरकारी योजना आखली. एचडीआयएलची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने भाडेकरूंसाठी सदनिका बांधण्याचे कंत्राट दिले. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट म्हाडाला देणार होती. चाळीतील 47 एकर जागेवर हे फ्लॅट्स बांधले जाणार होते, पण गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा म्हाडाला फ्लॅट्स दिले नाहीत. कंपनीने ही जमीन इतर आठ बिल्डर्सना 1034 कोटी रुपयांना विकली. एचडीआयएल कंपनीने केलेल्या या घोटाळ्यांमध्ये प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवान यांचा समावेश आहे, असा आरोप आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊतांचा मित्र असून, ईडीच्या तपासात त्याचे नाव पुढे आले आहे.


हेही वाचा : कोल्हापुरातून ‘लव जिहाद’चा संशय, भाजपाच्या नितेश राणेंचे ठिय्या आंदोलन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -