घरताज्या घडामोडी'महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे'

‘महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे’

Subscribe

राज्याच्या चित्ररथाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजूर झालेला नाही. त्यामुळे यावेळेस प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही आहे.

यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी राज्याचा चित्ररथ नाकारल्यामुळे तो दिसणार नाही आहे. मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या थीमवर यावेळी महाराष्ट्र चित्ररथ साकारणार होता. मात्र प्रस्ताव नाकारण्यात आल्याने प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्याचा चित्ररथ दिसणार नाही आहे. याचं पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्राचा चित्ररथ डावलाल तरी भाजप गप्प का? असा सवाल केला असून हेच जर काँग्रेसच्या राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती’, असा त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात ट्विट करून म्हणाले की, ‘महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत यामागे राजकिय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?,’ असा सवाल करत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

तसंच त्यांनी पुढील ट्विटमध्ये असं म्हटलं, ‘महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला.अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे. हे काँग्रेस राजवटीत घडले असते तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज गप्प का?,’ अशी त्यांनी भाजपला विचारणा केली आहे.

- Advertisement -

दरवर्षी ठराविक राज्यांना दिल्लीत राजपथावर चित्ररथाकरता संधी मिळते. यावेळी १६ राज्ये आणि ६ केंद्रीय मंत्रालये अशा एकूण २२ चित्ररथांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच यावेळी महाराष्ट्राकडून रंगभूमीच्या १७५ वर्षांच्या प्रवासावर आधारित चित्ररथाचा प्रस्ताव होता. पण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजूर झालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणे बंगालचाही चित्ररथ नाकारण्यात आला आहे.


हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -