घरमहाराष्ट्रदया कुछ तो गडबड है..., सीबीआयच्या कारवाईवर संजय राऊतांनी उठवलं शंकेचं मोहोळ

दया कुछ तो गडबड है…, सीबीआयच्या कारवाईवर संजय राऊतांनी उठवलं शंकेचं मोहोळ

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने १०० कोटीच्या वसुली प्रकरणी छापेमारी करून गुन्हा दाखल केला आहे. अचानक सीबीआयने केलेल्या धाडसत्रावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. दया, कुछ तो गडबड है, असं म्हणत संजय राऊत यांनी देशमुखांवरील कारवाईवरच शंका निर्माण केली आहे. सीबीआयची कारवाई तर्कसंगत दिसत नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत सीबीआयच्या धाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “कुछ तो गडबड है…मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते.
अनिल देशमुखांवर धाडी, एफ.आय.आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं.

- Advertisement -

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी झाल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सीबीआयचा एक अजेंडा आहे. न्यायालयाचा आदेश आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नसल्याचं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – १०० कोटी वसूली प्रकरणात इतर पाच अनोळखी आरोपी कोण?


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -