घरताज्या घडामोडीस्थानिकांच्या विरोधामुळे नाणार रिफायनरीसाठी बारसूचा प्रस्ताव, राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार रिफायनरीसाठी बारसूचा प्रस्ताव, राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

Subscribe

कोकणातील नाणार रिफायनरीला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प बारसूला हलवण्यात यावा अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. रत्नागिरीतील स्थानिकांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प बारसूला करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. स्थानिकांचा विरोध नसेल तर शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही. राज्याच्या आणि देशाच्या विकासाला खिळ बसेल अशी भूमिका शिवसेनेची नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊतांनी नाणार रिफायनरीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्या प्रकल्पाला किंवा कोणत्या विकास कामाला, राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कधीच पुढाकार घेतला नाही. कोकणात ज्या भागात हा प्रकल्प होत आहे. तिकडची शेती, फळबागा, समुद्र, मच्छिमार समाज यांचा विरोध प्रकल्पाला आहे. कारण या प्रकल्पामुळे त्यांच्या रोजीरोटी, शेती आणि फळबागा नष्ट होतील. यासाठी त्यांचे आंदोलन तेव्हासुद्धा सुरु होते आणि आजही ते आंदोलन नाणार भागात संपलेले नाही. याचा अर्थ तो प्रकल्प होऊ नये असे नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.

- Advertisement -

विदर्भात प्रकल्प करण्याची मागणी

दरम्यान संजय राऊत पुढे म्हणाले की, विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख भेटून गेले. त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प विदर्भात नेता आला तर आम्ही स्वागत करु, समृद्धी महामार्ग जो होत आहे. त्याच्या आसपास पाण्याच्या जागा आहेत. तिथे हा प्रकल्प होऊ शकला तर त्याचा फायदा महाराष्ट्र आणि विदर्भाला होईल. याचा अर्थ त्या प्रकल्पाला विरोध नाही तर विरोध लोकांचा आहे तो त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

लोकांचे नुकसान होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर प्रकल्पासंदर्भात दुसऱ्या जागेचा पर्याय सुचवला असेल तर तो त्याच भूमिकेतून सुचवला असेल. यातील मला काही तांत्रिक बाबी माहिती नाहीत. मात्र आशिष देशमुखांनी विदर्भासंदर्भात भूमिका मांडली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेसुद्धा भूमिका मांडली आहे. हा प्रकल्प कुठेही झाला तरी तो महाराष्ट्रातच असेल त्यामुळे आमचा राजकीय विरोध असण्याचे कारण नाही.

- Advertisement -

यूपीएचे नेतृत्व पवारांनी करावं अशी आमचीही भूमिका

यूपीएचे अध्यक्ष शरद पवार यांना करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही नेहमीच या भूमिकेचे स्वागत केले आहे. शरद पवार या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. आज जर विरोधी पक्षाची एकजूट करायची असेल, अनेक राज्यातील बिगर भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि भाजपविरोधकांना एकत्र आणायचे असेल तर ते काम शरद पवार करु शकतात याच्याविषयी सर्वांच्या मनात खात्री असल्यामुळे सगळे आपली भूमिका मांडत आहेत. आम्ही अशी भूमिका यापूर्वीच मांडली आहे.


हेही वाचा : शरद पवारांना यूपीए अध्यक्ष करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत प्रस्ताव

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -