Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची - संजय राऊत

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची – संजय राऊत

Related Story

- Advertisement -

आम्ही वाघाशी मैत्री करायला तयार आहोत असं म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेकडे मैत्रीसाठी हात पुढे करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं.

वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच, असं चंद्रकांत पाटील काल पुण्यात म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असं उत्तर राऊत यांनी दिलं. यावेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा दिल्या. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या.

विधानसभेला शंभरी पार

- Advertisement -

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना विधानसभेतील जागा शंभरी पार करणार, असं म्हटलं. प्रत्येक पक्षाचं लक्ष असतं विधानसभेवर. आम्हालाही वाटतं की आमचा आकडा विधानसभेवर १०० च्या पार जावा. त्यासाठी आतापासून प्रयत्न सुरु आहेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. तिन्ही पक्ष आपआपल्या पक्षासाठी काम करत आहेत. ते गरजेचं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

मालाड दुर्घटना दुर्दैवी

संजय राऊत यांनी मालाड दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मालाड इमारत दुर्घटना दुर्दैवी आहे. टीका करणाऱ्यांना करु द्या, स्वत: मुख्यमंत्री काल रस्त्यावर उतरले. सगळेच काल रस्त्यावर उतरले होते. टीका करणाऱ्यांना काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

 

- Advertisement -