घरमहाराष्ट्रदिल्लीपासून गल्लीपर्यंत सामना वाचावाच लागतो अन् धोरणं बदलावीही लागतात; राऊतांचा नाना पटोलेंना...

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सामना वाचावाच लागतो अन् धोरणं बदलावीही लागतात; राऊतांचा नाना पटोलेंना टोला

Subscribe

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही सामना वाचायचा सोडून दिला असं वक्तव्य केलं होतं. यावर आता शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना सामना वाचावाच लागतो अन् धोरणं बदलावीही लागतात. केंद्रातील नेते सामनाची दखल घेतात. त्यामुळे सामना कोण वाचत नाही यावर लक्ष देऊ नका, असा टोला राऊतांनी नाना पटोले यांना लगावला.

“कोण काय म्हणतंय, सामना कोण वाचत नाही त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सामना हा वाचावाच लागतो मग ते दिल्ली असो की गल्ली असेल…त्यानुसार धोरणंही ठरवावी लागतात. सामना काय करु शकतो हे महाराष्ट्रातील सत्तांतरात पाहिलेलं आहे आणि याआधीही पाहिलेलं आहे. आजही सामनाच्या शिरोभागी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव झळकतंय त्यामुळे तीच ताकद सामनाची आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“काँग्रेसच्या पराभवाचे प्रश्न सामनाने उपस्थित केले होते, ते एका पोटतिडकीने उपस्थित केले होते. काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, स्वातंत्र्यलढ्यातील पक्ष आहे. त्या पक्षावर अशी वेळ यावी…यासंर्भात काही प्रश्न निर्माण केले तेच प्रश्न काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये आसाम आणि केरळला आपण सत्ता का स्थापन केली नाही, हेच प्रश्न त्यांनी उपस्थित केले जे सामनाने केले होते. बंगाल आणि तामिळनाड सोडून द्या पण आसाम आणि केरळला सरकार स्थापन करण्यासारखी परिस्थिती असताना सत्ता स्थापन केली नाही ही एक वेदना आहे सगळ्यांची…सामनाने जे प्रश्न उपस्थित केले आहेत तेच प्रश्न सोनिया गांधींनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काय बोलतं त्यापेक्षा राष्ट्रीय प्रश्नावरती राष्ट्रीय नेते काय बोलतात याकडे आमचं लक्ष आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -