Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी आम्हाला कोणी कामगारांचे प्रश्न शिकवण्याचे गरज नाही, खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य

आम्हाला कोणी कामगारांचे प्रश्न शिकवण्याचे गरज नाही, खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य

Subscribe

शिवसेनेने कायम कामगारांच्या मागण्यांविषयी आस्था कायम ठेवली

शिवसेना ही कामगार क्षेत्रातून जन्माला आलेली आहे. शिवसेनेचा पाठीराखा हा मुंबईतला आहे. गिरणी कामगार मजूर वर्ग आणि कष्टकरी हाच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कष्टकरांचं नेतृत्व शिवसेना करत आहे. त्यामुळे कामगारांबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे आम्हाला सांगण्याची गरज नाही. असे शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांविषयी वक्तव्य केलं आहे. आता मी एक व्हिडिओ पाहून एसटी कर्मचाऱ्यांना पाठवला. आज ज्या मागण्या एसटी कर्मचारी करत आहेत. त्याच मागण्या घेऊन फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एसटी कामगार संघटनेचे लोक गेले होते. परंतु त्यांनी ज्या प्रकारे त्यांची हकालपट्टी केली. हे पाहून मला हसू आलं. कोविड काळामध्ये सरकारची परिस्थिती पाहिली असता, आर्थिक संकट आहे. तसेच त्या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री बोलतील. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेने कायम कामगारांच्या मागण्यांविषयी आस्था कायम ठेवली आहे. कारण कामगारांच्या लढ्यातूनच हा महाराष्ट्र निर्माण झाला आणि शिवसेनेचा जन्म झाला. त्यामुळे आम्हाला कोणी कामगारांचे प्रश्न शिकवण्याचे गरज नाही. ही तुम्ही आता जी नौटंकी करत आहात, आंदोलन करणं, अटक करूण घेणं आणि कामगारांना फूस देणं अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच कोणाचं
नुकसान करू नये, यापलीकडे मी काय सांगणार, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणातील मोठी बातमी : आशिष मिश्राच्या रायफलमधून सुटली गोळी


- Advertisement -

 

पुढे संजय राऊत म्हणाले की, कधी कोणाबरोबर काय फोटो असेल, हा संबंध असल्याचा पुरावा होऊ शकत नाही. या रियाज भाटीचे फोटो हे पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुद्धा आहेत. गृहमंत्र्यांचे काही फोटो मध्यांतरी प्रसिद्ध झाले होते. कोण कोणाच्या बाजूला उभा राहील आणि कोण कोणाचे फोटो काढेल. २० वर्षापू्र्वीर्ची व्यक्ती आणि आजची व्यक्ती यांच्यामध्ये फरक असतो. परंतु भाजप पक्षाकडे जी धुलाई मशीन आहे. त्याच्यामध्ये घातल्यावर स्वच्छ होतात. त्यासाठी त्यांनी मशीन तयार केली आहे. हे सर्व गुंड आणि बदमाश दाऊदचा माणूस, छोटा शकिलचा माणूस याचा माणूस त्याचा माणूस तसेच तो आमच्याकडे असला की, याचा आणि त्याचा माणूस. परंतु त्यांच्या वॉशिंगमध्ये गेला की, एकदम शुभ्र आणि चकचकित असा दाणेदार शुभ्रपणा असतो. सध्याच्या राजकारणामध्ये कोणीही कोणाच्या संदर्भात असं बोट दाखवू नये. संत सज्जनांचं साधूंचं राजकारण राहिलेलं नाही. निवडणूका जिंकण्यासाठी सध्या राजकारण कोणत्या थराला गेलंय. ते आपण पाहतो. पण महाराष्ट्राला हळूहळू हा चिखलफेकीचा जो डाग लागत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहीजे आणि इतर प्रश्नाकडे पहायला हवं नक्की ही सुरूवात ज्यांनी केली, ते आता पळून जात आहेत.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -