थोडे दिवस थांबा, संजय राऊत यांचा भाजपला इशारा

shivsena mp sanjay raut warn to bjp

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आजी-माजी या विधानावरील स्पष्टीकरण दिलं. ‘भाजपातील अनेक जण शिवसेनेत येऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे संकेत होते,’ असे संजय राऊत म्हणाले. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेत भाजपचे काही नेते जाणार आहेत, यामध्ये काही तथ्य नाही असे म्हणाले. या अनुषंगाने संजय राऊत यांनी थोडे दिवस थांबा असा इशारा भाजपला दिला आहे.

खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अमरिंदर सिंह यांचा राजीनामा हा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच  भाजपमधील नेते शिवसेनेते जाणार नाही या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, ‘त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर थोडे दिवस थांबा.’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी भाजपातील महत्त्वाचे नेते संपर्कात असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विधानांवर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला ते म्हणाले की, ‘सनसनाटी बातम्या निर्माण केल्याने काही होत नाही. २० ते २२ महिने झाले असंच चालंय. एकाही आमदाराला ते आमच्या हात लावू शकले नाहीत. कितीही माणसं पळवायचा प्रयत्न केला तरी लोकांचं मोदींवर प्रेम आहे. उलट आम्ही पंढरपूर निवडणूक जिंकलो आहे. आता पुढे देखील अशाच प्रकारे आम्ही जिंकू.’


हेही वाचा – ‘माजी मंत्री म्हणू नका’ या वक्तव्याचं चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले….