Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका; राऊतांचा भाजपला इशारा

शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका; राऊतांचा भाजपला इशारा

Related Story

- Advertisement -

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने बुधवारी शिवसेना भवनावर मोर्चा काढला. यानंतर शिवसैनिक आणि आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपला दिला आहे.

“शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणात नाही. नक्कीच एक टोळी त्यासाठी आली होती. पण ती नक्की कशासाठी आली होती. त्यांचा संबंध काय? हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. हुतात्मा स्मारक ज्या कारणासाठी आपण आपला स्वाभिमान म्हणून जगतो. त्याच अस्मितेचं प्रतिक शिवसेना भवन…शिवसेना भवन हे बाळासाहेब ठाकरे यांची वास्तू…मराठी अस्मितेचं प्रतिक असलेली वास्तू. त्याच्यावरती चाल केल्याचा प्रयत्न केला शिवसैनिक, मराठी माणून गप्प बसेल का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

तुम्हाला लिहिता वाचता येतं का?

- Advertisement -

“तुम्ही म्हणता राम मंदिरासंदर्भात आरोप केले. कोणी आरोप केले. तुम्हाला काही लिहिता वाचता येतं का? तुमचा काही शिक्षणाचा गंध काही आहे का? सामनामध्ये काय लिहिलं ते वाच किंवा आमचे प्रवक्ते काय बोलले ते ऐका. जे आरोप झाले आहेत, ते जे आरोप द्वेषबुद्धीने केले असतील तर त्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असं सामनाच्या अग्रलेखात आम्ही स्पष्ट केलं आहे. याच्यावर एखाद्याला मिर्च्या का झोंबाव्यात? भाजपवर कुठेही थेट आरोप केलेले नाही आहे, की हा घोटाळा भाजपने केला आहे. राम मंदिर तिर्थ क्षेत्र न्यास ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. त्यामधअये नेमलेली माणसं ही स्वतंत्र आहेत. त्यांच्यात भाजपचे कार्यकर्ते आहेत का? नाही ना! खुलासा विचारण हा काही देशात गुन्हा झाला का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“श्रद्धेच्या वास्तू संदर्भात आरोप होत आहे. त्या आरोपावरती लोकांनी खुलासा मागितला तर तो काही गुन्हा आहे का? ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा किंवा सेना भवनाच्या दिशेने पुढे येण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलेला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादेत राहुद्या. त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू देऊ नका. आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे,” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

 

- Advertisement -