संभाजीराजेंविरोधात भूमिकेनंतर संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर, पक्षाच्या बैठकांना लावणार हजेरी

maharashtra political crisis sanjat raut criticizes eknath shinde and bjp

युवराज संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेकडून शिवबंधन हाती बांधण्याची ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजेंनी ऑफर नाकारली यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत कोल्हापूर दौरा करणार आहेत. राऊत तीन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. संभाजीराजेना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी नाकारल्यानंतर पहिल्यांदाचा कोल्हापूरमध्ये जाणार आहे. पक्षवाढीसाठी शिवसंपर्क अभियानादरम्यान बैठका आणि मेळावे घेणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना कोल्हापूर दौऱ्याची माहिती दिली आहे. माझ्यावर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मी ३ दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहे पक्षाच्या बैठका, मेळावे, शिवसंपर्क अभियान या माध्यमातून पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न करु असे राऊत म्हणाले आहेत.

ओवैसींना भिवंडीमध्ये भाजपने बोलावलंय – राऊत

असदुद्दीन ओवैसी खासदार आहेत. संसदेचे सदस्य आहेत. त्यांच्या पक्षाची भूमिका आणि आमची भूमिका टोकाचे अंतर आहेत. जोपर्यंत भिवंडीमध्ये येऊन ते कायद्याचे उल्लंघन करत नाही तोपर्यंत त्यांच्यावर बंधन टाकू शकत नाही. शेवटी हा निर्णय पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात घ्यायचा असतो. ओवैसी संपूर्ण देशात फिरत असतात. जेव्हा जेव्हा भाजपला त्यांची गरज लागते तेव्हा येत असतात. भिवंडीमध्येसुद्धा त्यांना बोलवण्यात आले आहे. परंतु तेथील जनता विचार करुन निर्णय घेणारी आहे. ओवैसी असेल नाहीतर कोणीही असेल महाराष्ट्रात विष पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर भिवंडीतील मुस्लिम जनता ओवैसींना समर्थन नाही देणार.

राऊतांकडून नितीन गडकरींचे कौतूक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, जो विकास दिसतो आहे. ज्या विकासाची चित्र दाखवली जात आहेत. ज्या विकासाची चित्र दाखवली जात आहेत. त्यातील ९० टक्के काम नितीन गडकरी यांचे आहे. रस्ते, पूल देशाच्या सीमेपर्यंत देशात उत्तम अशी दळणवळणाची कामे झाली आहे. याचे श्रेय नितीन गडकरी यांना दिले पाहिजे. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाच्या कामात राजकारण न आणणारा शरद पवार यांच्यानंतर कोणी असेल तर ते नितीन गडकरी आहे. ते महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे त्यांचा मला अभिमान आहे. देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे योगदान काय हे नितीन गडकरी यांनी गेल्या ७ वर्षांत केलंय त्या कामातून दिसत आहे. नितीन गडकरी भाजपमध्ये असले तरी देशातील प्रत्येक नेता आणि विरोधी कार्यकर्ता त्यांचे चाहते आहेत. टीका होत असतात परंतु गडकरींच्या टीकेत कधी विखार आणि विष नसते. ते स्वभावाने फटकळ असले तरी ते मनाने निर्मळ आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी गडकरीचे कौतूक केलं आहे.


हेही वाचा : माझ्याकडे आलिशान गाड्या पण त्यामध्ये बसण्यासाठी वाघासारखा बाप नाही, वसंत मोरेंची भावूक पोस्ट