Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र 'भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन त्रास देतेय, हा सरनाईकांच्या पत्राचा सार'...

‘भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन त्रास देतेय, हा सरनाईकांच्या पत्राचा सार’ – राऊत

सेनेला गटबाजीनं पोखरलेलं नाही, उद्धव ठाकरेंसह सर्व शिवसैनिक सरनाईकांच्या पाठीशी आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घ्या असं म्हटलं आहे. या पत्रानंतर खळबळ उडाली असून शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देतेय, असा सार प्रताप सरनाईक यांच्या पत्राचा आहे, असं राऊत म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते.

“भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देत आहे, असं त्यांनी पत्रात स्पष्ट म्हटलं आहे. त्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावं, असा त्यांच्या संपूर्ण पत्राचा अर्थ आहे,” असं संजय राऊत म्हणाले. “पण हे प्रताप सरनाईक यांचं मत झालं. पण पक्षाची एक भूमिका असते, जी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांशी चर्चा करुन ठरवली आहे. त्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. विनाकारण त्रासाशी कसा सामना करायचा यासाठी संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे. खुद्द उद्धव ठाकरे हे त्यांच्या पाठिशी आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

शिवसेनेला अजूनतरी गटबाजीनं पोखरलेलं नाही

- Advertisement -

शिवसेनेत एकच गट आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने गट ओळखला जातो. आमच्या पक्षात वेगवेगळे गट नाही आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आम्ही सर्व काम करतो. अजूनतरी शिवसेनेला गटबाजीनं पोखरलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

महाभारतातील योद्धे आम्हीच

सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळे विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही वाघाच्या काळाजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं असं नाही. महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.

- Advertisement -

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आज आम्ही राजकारणात आलेलो नाही. एक जमाना लोटलाय. पांढरे झाले. परत काळे करत आहोत. फार फार तर काय कराल, तुरुंगात टाकाल. आमची तयारी आहे तुरुंगात जायला. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

 

- Advertisement -