Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले...

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना-मनसे युती संदर्भात मिश्कीलपणे केलेल्या एका वक्तव्यानंतर या चर्चेला अधिक उधाण आले. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

“परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं”, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर मनसेची काय प्रतिक्रिया येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

नुकत्याच एका मुलाखतीत राज ठाकरे यांना भविष्यातील शिवसेना-मनसे युतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी ‘परमेश्वराला ठाऊक’, असे सूचक वक्तव्य केले होते. दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगली होती. मात्र आता हीच चर्चा शिवसेना आणि मनसे युतीबाबत होत आहे.

 

- Advertisement -