शिवसेनेत इतका असंतोष कधी उफाळून आला नव्हता, जेवढा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतच्या सत्तेतून उफाळून आला- श्रीकांत शिंदे

shivsena mp shrikant shinde slams ncp and shiv sena and congress in thane speech

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात आज मोठं शक्ती प्रदर्शन केले. यावेळी शक्तीप्रदर्शनात ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी आक्रमक भाषण केले. श्रीकांत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केला. “राष्ट्रवादीतील लोकांबरोबर जर शिवसेना पक्ष वाढणार असेल ज्यावर आपला पूर्ण भरोसा आहे.. अडीच वर्षात इतिहासात शिवसेनेत इतका असंतोष कधी उफाळून आला नव्हता जो आता राष्ट्रावादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आल्यानंतर आला आहे,” अशा शब्दात ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न झाला. विशेषत: राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दाबण्याचा मोठ्याप्रमाणात प्रयत्न आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आमदारांना जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केला.

शिवसेनेचा गेली कित्येक वर्ष खांद्यावर भगवा ध्वज घेऊन लढतोय. फक्त लढतोय. त्याला वाटत होत सत्ता आल्यानंतर आपल्या गावचा रस्ता होईल. शहरातील रस्ता होईल, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांना शिवसंपर्क अभियानासाठी पाठवलं. यावेळी सातारा, परभणी गेल्यानंतर परिस्थिती जी ऐकली, तिथे सामान्यांच नाही तर आमदाराची होती, आमदारांना इथे निधी मिळत नाही, आमदार आहोत पण आमच्या विधासभेतील भूमिपूजन हे राष्ट्रवादीचा पालकमंत्री करतो ही तेथील परिस्थिती आहे. आमदारांना निधी मिळत नाही. निधी नगरविकास विभागाकडून मिळाला तर तो निधी थांबवण्याचे काम डीपीडीसीडीमध्ये मधील राष्ट्रवादीचे पालकमंत्री करत करतात. अशा परिस्थितीत काम कसं करायचं, विरोधात होतो तेव्हा सांगू शकत होतो निधी मिळत नाही म्हणून. पण आज सत्तेमध्ये असून काम होत नसेल सामान्यांना न्याय देऊ शकत नसेन तर काय फायदा आहे. अशा भावना श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या.

शिवसंपर्क अभियानची पहिली बैठक दिल्लीत झाली. कार्यकर्त्याचा जीव या आघाडीमध्ये धुसमटतोय, त्यांचा कुठलं काम होत नाही हे मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगितलं. शिवसंपर्क अभियनानंतर दुसऱ्या मोहिमेसाठी साताऱ्यात गेलो. साताऱ्यात साखर कारखाने खूप मोठ्या संख्येने आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. याठिकाणी ऊस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला पहिलं विचारलं जात तू कोणत्या पक्षाचा? त्यानंतर त्याला ऊस घेतला जातो. यात शेतकरी जर शिवसेनेचा असेल तर त्याचा ऊस शेवटी घेतला जातो. असा आरोपही श्रीकांत शिंदे यांनी केला.


बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरल्यास कायदेशीर कारवाई, संजय राऊतांचा इशारा