Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय आधीच झाला होता, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय आधीच झाला होता, विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. शिवसेनेतील बंडखोरीचे लोण खासदारांमध्येही पोहोचले आहे. शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी एकत्र येत शिंदे गटाचे आमदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ जुलैला त्यांच्या गटनेतेपदाबाबत मागणी केली होती, मात्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी १८ जुलैलाच हा निर्णय घेतला. त्यामुळे बंडखोरांना निवडण्याचा निर्णय आधीच झाला होता, असा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

आम्ही ६ जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय कामकाज मंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर १८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता लोकसभा अध्यक्षांच्या घरी जाऊन शिवसेनेच्या गटनेतेपदावर कुणी दावा केल्यास आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची संधी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर १९ जुलै रोजी लोकसभा अध्यक्षांना भेटून पत्र सुद्धा दिलं होतं. मात्र, त्यांनी आमच्या पत्राची दखल न घेता लोकसभेतील शिवसेना गटनेते बदलले आहेत, असं राऊत म्हणाले.

लोकसभा अध्यक्षांनी आमच्या पत्राची दखल न घेता, नैसर्गिक न्यायाचं तत्व न पाळता निर्णय घेतल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. पक्षाचे प्रमुख गटनेतेपदाची निवड करतात. त्यासाठीचे पत्रही दिले जाते. माझ्या निवडीचेही पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले होते. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे.


- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापूर्वीच द्रौपदी मुर्मूंच्या गावात मिठाईची तयारी, विजय निश्चित?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -