घरताज्या घडामोडीगितेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी - सुनिल तटकरे

गितेंच्या वक्तव्यावर शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी – सुनिल तटकरे

Subscribe

राष्ट्रवादीचा जन्म हा कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खूपसून झाला, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार अनंत गीते यांनी केल्यानंतर आता या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. अनंत गीते यांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदवला आहे. शिवसेनेचे नेते अनंत गीते यांची अवस्था सध्या पक्षात सांगताही येत नाही, सहनही होत नाही, अशी आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून असे उद्गार आले असावेत. ते बोलल्याने काहीही फरक पडत नाही. अनंत गीते कोणाची भाषा करतात ते स्वतःच सांगू शकतात. पण गितेंच्या वक्तव्यावर शिवसेना भूमिका स्पष्ट करेल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Shivsena need to clarify on anant geete statement says sunil tatkare)

गितेंचे वक्तव्य नैराश्यातून

अनंत गिते यांचे आता वय झाले आहे. तसेच निवडणूकीतही पराभव झाला आहे. त्यामुळेच नैराश्यातून असे वक्तव्य आले असावे असेही तटकरे म्हणाले. सध्या राजकीय भान विसरून ते अशी टीका करत असावेत. अडगळीत पडलेल्या नेत्यांनी उत्तुंग नेतृत्वावर बोलल्याने काहीही कमी होणार नाही. पवार साहेबांचे राजकारण काय आहे ते सर्वांनाच माहिती आहे. तसेच पवार साहेब देशाचे नेते असुन आघाडीचे जनकही आहेत. ही आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अतिशय सक्षमपणे काम करत आहे. ज्या स्थितीमध्ये सरकार स्थापन झाले त्यामध्ये आघाडीचे जनकच पवार साहेब आहेत. त्यामुळेच हे सरकार उद्धवजींच्या नेतृत्वात सक्षमपणे काम करेल तसेच पुढची पाच वर्षे काम करेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

शिवसेनेने पक्षाअंतर्गत काय समज द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेनेने या प्रकरणात भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. जेव्हा शिवसेनेवर चंद्रकांत पाटील टीका करत होते तेव्हा मात्र अनंत गीतेंनी पुढे येऊन काहीही बोलण्याचे धाडस दाखवले नाही. चंद्रकांत पाटील शिवसेनेवर हल्ला करत होते तेव्हा अनंत गितेंचा स्वाभिमान कुठे गेला होता असाही सवाल त्यांनी केला.


हेही वाचा – काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसूनच राष्ट्रवादीचा जन्म, शिवसेना नेते अनंत गीते आक्रमक

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -