कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून ‘मावळे’ होता येईल काय? शिवसेनेचा हल्लाबोल

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी बंडखोर आमदारही सभागृहात उपस्थित होते. फेट्यांच्या रुबाबात सर्व बंडखोर आमदारांनी विधानसभेत एन्ट्री घेतली. मात्र, भगवे फेटे घालून मावळे होता येईल का असा सावल सामनातून विचारण्यात आला आहे. 

Before going to the assembly, BJP and Shinde MLAs made strong entry in saffron headdress

आमदार आले, भगवे फेटे घालून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निष्ठेचे नाटक केले, पण या सगळ्यांचे चेहरे साफ पडलेले दिसत होते. त्यांचे पाप त्यांचे मन कुरतडत आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक चैतन्य व ऊर्जेचा सूर्य आहे, हे भगवे फेटेधारी आमदार काजवेही नव्हते. शिवसेनेत असताना काय ते तेज, काय तो रुबाब, काय ती हिंमत, काय तो सन्मान, काय तो स्वाभिमान… असे बरेच काही होते. “कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” असे गर्जले जात होते. तसे काही चित्र आता दिसले नाही. कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून ‘मावळे’ होता येईल काय?, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे. (Shivsena paper samana edit on rebel mla)

फोटो पाहा – विधानसभेत जाण्यापूर्वी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांची भगव्या फेट्यात दमदार एन्ट्री

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी बंडखोर आमदारही सभागृहात उपस्थित होते. फेट्यांच्या रुबाबात सर्व बंडखोर आमदारांनी विधानसभेत एन्ट्री घेतली. मात्र, भगवे फेटे घालून मावळे होता येईल का असा सावल सामनातून विचारण्यात आला आहे.

नार्वेकरांना कधी, कुठे टांग द्यायची हे कळतं

“शिंदे गटाच्या आमदारांच्या जोरावर भाजपाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणवून घेणारे गृहस्थ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजपा असा प्रवास करीत ते विधानसभा अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. कधी, कुठे टांग टाकायची हे त्यांना कळते. भारतीय जनता पक्षात शिवसेनेचा किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करण्याची कुवत आणि हिंमत नाही. शिवसेनेतच तोडफोड करून त्यातील एखादा शिवसेनेच्या विरोधात उभा केला जातो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजपाने जिंकली यात आम्हाला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही

शिवसेनेचे राजन साळवी यांच्या बाजूने १०७ मते पडली. शिंदे गटाच्या भाजपपुरस्कृत आमदारांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही. त्यामुळे याबाबत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू होईल, फण आता हे सर्व टाळण्यासाठीच विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपने कायद्याचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीस बसवले आणि त्याबरहुकूम त्यांना हवे तसे निर्णय घेतले जातील. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना या आमदारांमना मतदानात भाग घेऊ देणे बेकायदा आहे. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा मोठाप्रवास करून शिंदे गटाचे आमदार मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळापासून कुलाब्यातील त्यांच्या हॉटेलपर्यंत सुरक्षेसाठी हजारो केंद्रीय जवान दुतर्फा बंदुका घेऊन उभे होते. फक्त हवाई दल आणि सैन्यच वापरायचे काय ते बाकी होते. कसाबच्या सुरक्षेसाठीही इतके पोलीस नव्हते, पण महाराष्ट्र हा शहीद स्वाभिमानी तुकाराम ओंबळेंचा आहे, हे शिंदे गटाच्या आमदारांनी विसरू नये, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

न्यायाचा तराजू सत्याचा की सुरतच्या बाजारातला?

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हेड काऊंट पद्धतीने झाली. पण महाविकास आघाडीसरकारला तशी परवानगी नव्हती. त्यावेळी गुप्त मतदान त्यांना हवे होते. मग राज्यपालांच्या हातातील संविधानाचे पुस्तक नक्की कोणाचे? डॉ.आंबेडकरांचे की अन्य कोणाचे? त्यांच्या हातातील न्यायाचा तराजू हा सत्याचा की सुरतच्या बाजारातला? हा प्रश्न मराठी जनतेला पडला आहेच. महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्याचा म्हणजे हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे सरकार पायउतार झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला.