घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या नावावर तिसऱ्याचाच दावा, महाडच्या वाडकर कुटुंबात आनंदोत्सव

शिवसेनेच्या नावावर तिसऱ्याचाच दावा, महाडच्या वाडकर कुटुंबात आनंदोत्सव

Subscribe

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात वादंग निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शिंदे गट-उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपला सुरूवात झाली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं. शिवसेना नक्की कुणाची?, हा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगासमोर अद्यापही प्रलंबित आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं होतं. नाव आणि चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन नवीन पक्ष निर्माण झाले. परंतु आता शिवसेनेच्या नावावर तिसऱ्याच व्यक्तीने दावा ठोकला आहे.

१७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन होता. या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येत असतात. याच दिवशी महाड तालुक्यातील किये-गोठवली येथील माजी उपसरपंच पांडुरंग वाडकर यांनी १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या कन्येच्या नामकरण विधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आपल्या कन्येचे नावच शिवसेना असे ठेवल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

महाडच्या वाडकर कुटुंबात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पांडुरंग वाडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माझ्या स्वप्नात आले होते. बाळासाहेब ठाकरेंचा मी कट्टर कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मुलीचे नाव शिवसेना असं ठेवलं आहे. या नामकरणाच्या सोहळ्याला आजूबाजूच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. तसेच पांडुरंग वाडकर हे आपल्या कन्येला घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : जेव्हा मतं मागायची वेळ येते तेव्हा.., भारत जोडो यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागावर मोदींची टीका

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -