घरमहाराष्ट्रखोतकरांना उमेदवारी द्या, अन्यथा दानवेंना मदत करणार नाहीत - शिवसैनिक

खोतकरांना उमेदवारी द्या, अन्यथा दानवेंना मदत करणार नाहीत – शिवसैनिक

Subscribe

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळावी, अशी जालन्यातील शिवसैनिकांची इच्छा आहे. खोतकर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही, तर रावसाहेब दानवेंना लोकसभा निवडणुकीत मदत नाहीत, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना शिवसेनेची उमेदरी मिळाली नाही तर रावसाहेब दानवेंचे काम करणार नाही, असा इशारा जालन्याच्या शिवसैनिकांनी दिला आहे. सोमवारी संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युती संदर्भात महत्त्वाची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी युतीची घोषणा केली. परंतु, मन दुखावलेली शिवसेना भाजपला किता साथ देईल? याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, शिवसेना तालुका प्रमुख कैलास पुंगळे, युवा सेनेचे कार्यकर्ते अमोल ठाकूर यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले शिवसैनिक?

जालन्याचे शिवसैनिक म्हणाले की, ‘खोतकरांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही तर दानवेंना मदत करणार नाही. खोतकरांना लोकसभा निवडणुकीत उतरवणारच.’ त्याचबरोबर ‘शिवसेच्या कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाकणाऱ्या दानवेंच्या विरोधात खोतकरांना निवडणूक लडवू देण्याची विनंती शिवसेना पक्षप्रमुखांना करणार आहोत’, असे शिवसैनिक म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -