कोणाच्या बोलण्यावरून शिवसेना धोरण ठरवत नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

शिवसेनेचा जन्म या सगळ्या अस्मितेच्या प्रश्नावर झाला आहे. अशा प्रकारची भाषा दक्षिणेत जाऊन करा असे संजय राऊत म्हणाले आहे.

shivsena sanjay raut slams raj thackeray on shop marathi name plate decision
कोणाच्या बोलण्यावरून शिवसेना धोरण ठरवत नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

राज्य मंत्रिमंडळात दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. परंतु मराठी पाट्यांसाठी मनसे अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्यामुळे मराठी पाट्यांचे श्रेय मनसेचं असल्याचेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. कोणाच्या बोलण्यावरुन शिवसेना आपली धोरणं ठरवत नाही. आमच्या पक्षातूनच अनेक जण मराठीचा विचार घेऊन बाहेर पडले आहेत. मराठी शिवसेनेचा आत्म आहे. त्यामुळे कोणी काय बोलल तर त्यावर शिवसेनेचे धोरण ठरत नाही असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी पाट्यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्याचे श्रेय मनसेला दिलं आहे. तसेच राज्य सरकारला आता त्या निर्णयावर ठाम राहण्याचा सल्ला दिला आहे. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. राऊत म्हणाले की, कोणी काय सल्ला दिला आहे. यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्यावेळीपासून हे आंदोलन सुरु आहे. आमची स्थानीय लोकाधिकार समिती असेल ती अजूनही या प्रकारचे काम करत आहे.

अनेक पक्ष आमच्या पक्षातून बाहेर गेले आहेत परंतु तोच विचार घेऊन ते गेले आहेत. कोणाला काय बोलतात किंवा बोलतील याच्यावर महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे धोरण ठरवत नाही. मराठी अस्मिता हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी कधी आम्ही तडजोड करणार नाही असे संजय राऊत म्हणाले आहे.

तुम्ही महाराष्ट्रात राहता अन् महाराष्ट्राचा खाता..

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठी पाट्यांसाठी राज्य सरकारने खर्च करावा असे म्हटलं आहे. यावर राऊतांनी घणाघात केला आहे. ते आम्ही पाहू, महाराष्ट्रात राहत आहात महाराष्ट्रातील मातीतलं खात आहे. महाराष्ट्रातल्या मराठी मातीमध्ये तुम्ही श्वास घेत आहात. याचे ऋण फेडण्याची वेळ असताना महाराष्ट्राच्या खासदारांनी, आमदारांनी किंवा कोणीही असो व्यापाऱ्यांनी याला बेईमानी म्हणतात. शिवसेनेचा जन्म या सगळ्या अस्मितेच्या प्रश्नावर झाला आहे. अशा प्रकारची भाषा दक्षिणेत जाऊन करा असे संजय राऊत म्हणाले आहे.


हेही वाचा : मराठी पाट्यांचे श्रेय मनसेचं – राज ठाकरेंची भूमिका 


हेही वाचा : चंद्रकांत पाटलांनी चष्म्याचा नंबर तपासून प्रतिमेची काळजी घ्यावी, संजय राऊतांचा पलटवार