घरमहाराष्ट्रशिवसेनेचा वापर करुन माधुकरी मागू नका; राऊतांचा शिंदे गटाला इशारा

शिवसेनेचा वापर करुन माधुकरी मागू नका; राऊतांचा शिंदे गटाला इशारा

Subscribe

ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्षे हद्दपार झाले, त्यातील काही मोजके लोकं नंतर तरले पण बहुसंख्य आणि खासदार पराभूत झाल्याचं इतिहास सांगतो. आणि इतिहास बदलण्याची ताकद या गटात नाही, अशा शब्दात त्यांनी बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवणाऱ्या नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जात आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांना पदावरून हटवले जात आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर शिवसेनेकडून ही कारवाई होत आहे. अशात नुकतचं शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपानंतर हकालपट्टी झालेल्या शिवसेना नेत्यांवर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे. आत्तापर्यंत पक्षातून ज्यांची हकालपट्टी झाले त्यातील काही मोजके लोकं नंतर तरले पण बहुसंख्य आणि खासदार पराभूत झाल्याचे इतिहास सांगतो असे राऊत म्हणाले. आज ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाला शिवसेनेच्या नावाने सहानुभूती मिळवू नका, स्वतंत्र स्थान निर्माण करा असं राऊत म्हणाले.

हेही वाचा : नगराध्यक्ष, सरपंचाची निवडणूक थेट झाल्यानंतर पैशांची खेळी करता येत नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

- Advertisement -

निवडणुकीत एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही आमदार पराभूत झाला तर मी राजकारण सोडेन, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिला आहे. बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान नाही, आपल्या बेईमानीचे कारणं देत असतो. शिवसेना सोडली आहे तर शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा, स्वतंत्र संसार मांडा… शिवसेना शिवसेना का करता? बाळासाहेब ठाकरेंची ही खरी शिवसेना आहे आणि भविष्यात राहिलं… त्या शिवसेनेच्या पंखाखाली का जगताय… नका जगू… तुम्हाला स्वाभिमान असेल… स्वाभिमानासाठी सगळे बाहेर पडलात मग तुम्ही शिवसेनेशिवाय तुमचे स्वतंत्र स्थान निर्माण करा, आणि जनतेला दाखवा. असे आव्हान त्यांनी बंडखोर आमदारांना दिले आहे.

हेही वाचा : सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार लांबवण्यात काय अर्थ?, अजित पवारांचा सवाल

- Advertisement -

ज्यांची हकालपट्टी करण्यात आलेले अनेक लोकं आहेत ज्यांचा भाजप – शिवसेना युती असताना पराभव झाला आहे. ज्यांना आज भाजपचा पुळका आला आहे अशी अनेक लोकं भाजप सेना युती असताना निवडणुकीत पराभूत झालेत. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्षे हद्दपार झाले, त्यातील काही मोजके लोकं नंतर तरले पण बहुसंख्य आणि खासदार पराभूत झाल्याचं इतिहास सांगतो. आणि इतिहास बदलण्याची ताकद या गटात नाही, अशा शब्दात त्यांनी बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.


हेही वाचा : युवा सैनिकांनो! ‘हीच ती वेळ’ म्हणत आदित्य ठाकरेंचे नवे आवाहन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -