शिंदे गटाच्या आमदारांची दादागिरी थांबेना! संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण

शिंदे गटाच्या आमदारांची दादागिरी काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. नुकताच हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी एका प्राचार्यांनाच मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉ. अशोक उपाध्याय असं या प्राचार्यांचं नाव आहे.

शिंदे गटाच्या आमदारांची दादागिरी काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. नुकताच हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी एका प्राचार्यांनाच मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉ. अशोक उपाध्याय असं या प्राचार्यांचं नाव आहे. संतोष बांगर यांनी प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (shivsena shinde camp mla santosh bangar in controversy once again beaten teacher)

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांना मारहाण केली. हे प्राचार्य महिला प्राध्यापकांना त्रास देत असल्याची तक्रार आमदार बांगर यांच्याकडे आली होती, त्यानंतर तंत्रनिकेतन महाविद्यालयात जाऊन संतोष बांगर यांनी मारहाण केली.

दरम्यान, मागील काही काळापासून संतोष बांगर हे वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. याआधी त्यांनी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला निकृष्ट दर्जाचं जेवण देतो, असा आरोप करत मारहाण केली. हिंगोलीमध्येच विमा कंपनी कार्यालयात तोडफोड झाली तेव्हा बांगर यांनी कृषी अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोपही संतोष बांगर यांच्यावर करण्यात आला.

यापूर्वी बांगर यांनी ऑक्टोबरमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातला होता. हिंगोलीचे कृषी अधीक्षक अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. वीज कापली म्हणून बांगर यांनी पवार नावाच्या एका कर्मचाऱ्याला रट्टे देईन अशी धमकी दिली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी समज दिल्या नंतर ही आमदार बांगर यांचे कारनामे सुरूच आहेत.

त्याशिवाय, मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा होती.


हेही वाचा – पुणे हादरलं! भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांची आत्महत्या