घरमहाराष्ट्रदगड मारुन सभा बंद करणारे आम्ही राऊतांनी नादाला लागू नये; गुलाबराव पाटलांचा...

दगड मारुन सभा बंद करणारे आम्ही राऊतांनी नादाला लागू नये; गुलाबराव पाटलांचा इशारा

Subscribe

दगड मारुन सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही, त्यामुळे राऊतांनी आमचा नाद करु नये, असं म्हणत पाटलांनी राऊतांना थेट इशाराच दिला आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांवर गुलबी गॅंग अशी टीका केली होती. या गुलाबी गॅंगने स्टेशनवर येऊन दाखवावं,असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आता याला शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तर देत, राऊतांना इशारा दिला आहे. ( Shivsena Shinde group leader Gulabrao Patil criticised Thackeray group leader Sanjay Raut )

….त्यामुळे राऊतांनी आम्हाल चॅलेंज करु नये

रविवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावातील पाचोरा येथे सभा आहे. या सभेनिमित्त जळगावात जायच्या आधी राऊतांनी गुलाबराव पाटलांना चॅलेंज दिलं होतं की, आम्हाला विरोध करण्यासाठी तुम्ही स्टेशनवर पाय तर ठेवून दाखवा. यावर आता गुलाबराव पाटलांनी राऊतांचा समाचार घेतला आहे. पाटील म्हणाले की, आमचे कार्यकर्ते स्टेशनवर येऊन गेले पण. आम्हाला या आयडीया राऊतांनी शिकवून नये. राऊत कधीच शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये नव्हते. त्यांना शिवसेनेचं आंदोलन कसं करावं हे माहिती नाही. दगड मारुन सभा बंद करणारे लोक आहोत आम्ही, त्यामुळे राऊतांनी आमचा नाद करु नये, असं म्हणत पाटलांनी राऊतांना थेट इशाराच दिला आहे.

- Advertisement -

दम असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या 

माझ्या वक्तव्यांना शिवसेना, शिंदे गटातील नेते घाबरतात कारण मी सत्य बोलतो, असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. आता त्यावर प्रत्युत्तर देताना, गुलाबराव पाटलांनी राऊतांना थेट चॅलेंज दिलं आहे. आमच्या  मतांवर खासदार झालेला हा आम्ही  याला घाबरणार ? हिंमत असेल तर राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन निवडून यावं. आमची मतं घ्यायची खासदार व्हायचं आणि आम्हालाच बोलायचं हे कोणत्या गणितात बसतं? बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत त्यांनी आम्हाला याची अक्कल शिकवू नये, असं पाटील यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: ‘सण केवळ दंगलीसाठीच…’ वक्तव्यावरून भाजपा आक्रमक; आव्हाडांविरोधात पोलिसात तक्रार )

- Advertisement -

राऊतांच्या वक्तव्याचा विरोध 

राऊत उठून, सुटून काहीही बोलत असतात. त्यांना हे असं बोलण्याची मुभा आहे का?  राऊतांच्या या अशा वक्तव्यांचा आम्ही विरोध करतो आणि हा विरोध कायम करत राहणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -