शिवसेना-मनसेमध्ये व्हिडीओ वॉर; बाळासाहेबांचा तो व्हिडीओ शेअर करत सेनेचा मनसेला टोला

राज ठाकरेंच्या या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेने देखील बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करत राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 'कुणीतरी माझी कॉपी करतंय', असं त्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब राज ठाकरेंचं नाव न घेता बोलत आहेत.

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. भोग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भोंगे हटवणार आहात की नाही, बाळासाहेबांचं ऐकणार की बेगडी धर्मनिरपेक्षतावादी पवारांचं ऐकणार? असा सवाल विचारला. त्यानंतर बाळासाहेबांचे भोंग्यांविरोधातल्या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला. त्यानंतर राज ठाकरेंच्या या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेने देखील बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करत राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कुणीतरी माझी कॉपी करतंय’, असं त्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब राज ठाकरेंचं नाव न घेता बोलत आहेत.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादेत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांवर देखील कारवाई होत असून, पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड सुरु आहे.

मशिदींवरील भोंगे हा धार्मिक प्रश्न नसून हा सामाजिक प्रश्न असल्याचं राज ठाकरे वारंवार सांगत आहेत. याच स्पष्टीकरण देण्यासाठी मनसेने दोन वेळा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या भाषणाचा आधार घेतला. आता मनसेला त्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी शिवसेनेने देखील बाळासाहेबांचे जुने व्हिडिओ जे राज ठाकरेंना बोचणारे आहेत, ते व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेने बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत. “कुणीतरी माझी कॉपी करत असल्याचं म्हणत वाचन वगैरे काही आहे का? असा सवाल केला आणि मराठी-हिंदुत्वाचे मुद्दे तुझ्या जन्माच्याअगोदर मी घेतले आहेत. बाळासाहेबांच्या टीकेनंतर समोर बसलेले शिवसैनिक प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करतात.”, असं या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत.

“आमच्या पुतण्याच्या डोक्यात काय शिरलंय, काही माहिती नाही… नेतृत्व हे जे आहे ना (समोर हजारोंच्या जनसमुदायाकडे बोट दाखवत) जे दिसतं ना, ते पाहिजे त्याला…. हे दृश्य शिवस्वरुप आहे.. हे शिवाचं रुप आहे…”, असं म्हणत बाळासाहेब संबंधित व्हिडिओमधून राज ठाकरेंना लक्ष्य करताना दिसून येत आहेत.


हेही वाचा – भोंग्यांनी दाबला सोमय्यांचा आवाज