घरमहाराष्ट्रशुभेच्छा देतानाच सरन्यायाधीशांच्या कोश्यारी, शिंदे आणि ठाकरेंना कानपिचक्या...

शुभेच्छा देतानाच सरन्यायाधीशांच्या कोश्यारी, शिंदे आणि ठाकरेंना कानपिचक्या…

Subscribe

 

मुंबईः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल जसा ऐतिहासिक आहे. तशीच त्यवरील सुनावणीही तितकीच ऐतिहासिक आहे. सुनावणी संपल्यावर निकाल राखून ठेवताना सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांनी याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. सुनावणीत न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच फटकारले होते.

- Advertisement -

जर तुम्हीच खरी शिवसेना आहात. शिवसेनेत फूट पडलेली नाही. मग तुमच्याबरोबर असलेले ३४ आमदारही शिवसेनेचे सदस्य असं म्हणूनच गृहीत धरावं लागेल. ते जर शिवसेनेचे सदस्य आहेत. मग सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न कुठे येतो?, असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला होता. यामुळे शिंदे गटाचा युक्तिवाद त्यांनाच कोंडीत टाकणारा ठरला होता.

महाविकास आघाडीत सरकारमधील तीन पक्षांनी तीन वर्षे सुखाने संसार केला. मग एका रात्रीत असं काय घडलं ज्यामुळे तीन वर्षांचा संसार मोडावा लागला? काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मतभेद नव्हते. दोघांचे मिळून ९७ आमदार आहेत. हा आकडाही मोठा आहे. शिवसेनेच्या ५६ पैकी ३४ आमदारांनी अविश्वास दर्शवला. त्यामुळे तीन पक्षांपैकी केवळ शिवसेनेतच मतभेद झाल्यानंतरही इतर दोन पक्ष आघाडीत कायम होते. बहुमत चाचणी बोलावण्याआधी राज्यपालांनी ही गोष्ट का लक्षात घेतली नाही? असं म्हणत न्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. ३० जूनला शिवसेना एकच होती. तुम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलात, असा टोला न्या. हिमा कोहली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांना लगावला होता.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावरही न्यायालयाने भाष्य केले होते. तुम्ही सांगत आहात की अशा सरकारला पुन्हा सत्तेत आणा ज्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ज्यांनी बहुमत चाचणीही दिली नाही, अशा मुख्यमंत्र्यांना आम्ही पुन्हा सत्तेवर कसं बसवू शकतो?” असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या वकीलांना केला होता.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -