घरमहाराष्ट्र'शिवसेने'साठी ठाकरे गट सरसावला; २० लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला सादर

‘शिवसेने’साठी ठाकरे गट सरसावला; २० लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाला सादर

Subscribe

20 Lakhs Affidavits | ठाकरे गटाकडून २० लाख प्रतिज्ञापत्रे आल्याने आता शिंदे गटाकडूनही तेवढेच प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने कौल देतंय हे पाहावं लागणार आहे.

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाने शिवसेनेवर दावा केल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाकडेही प्रलंबित आहे. पक्षावर दावा करण्याकरता दोन्ही पक्षांनी विहित नमुन्यात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने (Central Election Commission) दोन्ही गटांना दिले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या गटाने २० लाख प्रतिज्ञापत्रे (Affidavits) सादर केले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केली. यामुळे एका पक्षाचे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. फुटीमुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम झाला. परिणामी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. दोन्ही गटाने विविध याचिका दाखल करून पक्षावर दावा केला आहे. दरम्यान शिवसेना पक्ष आणि नावावरील वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे पक्षावर दावा करायचा असेल तर विहित नमुन्यात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दोन्ही गटांना देण्यात आले होते. त्यानुसार, ठाकरे गटाने २० लाख प्राथमिक सदस्यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला दणका, अडीच लाख प्रतिज्ञापत्रे केली बाद

ठाकरे गटाकडून २० लाख प्रतिज्ञापत्रे आल्याने आता शिंदे गटाकडूनही तेवढेच प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने कौल देतंय हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

शिंदे गटातील एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आतापर्यंत १० लाख ३० हजार सदस्यांचे प्रतिज्ञापत्र केले आहेत. तर, येत्य काळात अधिक १० लाख अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद

ठाकरे गटाकडून यापूर्वी ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. त्यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाने बाद ठरवली होती. प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकल्याने ही प्रतिज्ञापत्रे बाद करण्यात आली होती.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -