मुंबई : बाळासाहेबांनी कधीच कोणाची लाचारी केली नाही. आणि आज जे काही सुरू आहे, तो बूटचाटेपणा आहे. हे असलं काम आणि राजकारण बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा विचार एकनाथ शिंदेंकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर अजूनतरी आलेली नाही. सध्या जे राजकारण सुरू आहे, ते वेश्येचं राजकारण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. (shivsena ubt leader sanjay raut criticises narendra modi amit shah over duplicate shivsena)
सध्याचा महाराष्ट्र हा धोकादायक लोकांच्या हातात आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळे हे ईडी, सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद असल्याची टीका संजय राऊत यांनी यावेळी केली. आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या शत्रूला मदत केली. मोदी आणि शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत.
हेही वाचा – Sanjay Raut On Shinde : हे तर वेश्येचे राजकारण, संजय राऊत यांची सडकून टीका
मोदी – शहांचं एकच तत्त्व आहे, ते म्हणजे फोडा, झोडा आणि राज्य करा. यासाठीच अमित शहांना समांतर शिवसेना निर्माण करायची आहे. आणि त्यात एकनाथ शिंदे त्यांना मदत करत असल्याची टीका राऊत यांनी केली. जशी सृष्टी – प्रतिसृष्टी असते अगदी तसंच समांतर शिवसेनेच्या निर्मितीचा शहा यांचा हा प्रयत्न आहे. पण, ते हे विसरतात की अशी प्रतिसृष्टी कधी टिकत नाही. प्रति शिर्डी असते पण सगळे जण दर्शनासाठी शिर्डीला जातात, तसंच आहे हे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कोणी गांभीर्याने घेऊ नका, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. ते आमच्या सोबत होते तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती, आता त्यांनी ही प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता गमावल्याचे राऊतांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंनी यात पडण्यापेक्षा पालकमंत्र्यांचा वाद सोडवावा, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. यांनी लाचारी केली त्यामुळे ते महाराष्ट्राच्या शत्रूची लाचारी करत आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूची लाचारी करणे म्हणजे अफझलखानाच्या दरबारात मुजरे घालणं आहे. तेच तुम्ही इमाने इतबारे करा. मात्र, त्याने तुम्हाला प्रतिष्ठा मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पैसा फेको तमाशा देखो ही शिंदेंची विचारधारा आहे, त्यामुळेच त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असे सांगतानाच महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या प्रत्येकाला उखडून फेकणार असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.