Homeमहाराष्ट्रSanjay Raut On Shinde : हे तर वेश्येचे राजकारण, संजय राऊत यांची...

Sanjay Raut On Shinde : हे तर वेश्येचे राजकारण, संजय राऊत यांची सडकून टीका

Subscribe

सध्या जे राजकारण सुरू आहे, ते वेश्येचं राजकारण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Sanjay Raut on Eknath Shinde Dirty Politics मुंबई : बाळासाहेबांनी कधीच कोणाची लाचारी केली नाही. आणि आज जे काही सुरू आहे, तो बूटचाटेपणा आहे. हे असलं काम आणि राजकारण बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा विचार एकनाथ शिंदेंकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर अजूनतरी आलेली नाही. सध्या जे राजकारण सुरू आहे, ते वेश्येचं राजकारण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.(shivsena ubt leader sanjay raut criticises shivsena dcm eknath shinde over dirty politics)

महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्वच पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. तोच धागा पकडून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सकाळच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतले.

आजचे राज्यकर्ते हे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत, महाराष्ट्राची लूट करत आहेत. हा काही बाळासाहेबांचा विचार नाही असं सांगतानाच बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदेंकडून शिकण्याची वेळ आमच्यावर आली नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

सध्याचा महाराष्ट्र हा धोकादायक लोकांच्या हातात आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख नाहीत की त्यांचे वारसदारही नाहीत, की त्यांनी आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवावेत. उलट एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळे हे ईडी, सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद असल्याची टीका त्यांनी केली. आपली कातडी वाचवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या शत्रूला मदत केली.

हेही वाचा – Bjp Vs Thackeray : “आदित्य ठाकरे बालिश, बिघडलेले कार्टे, मंत्री असताना दोन वर्षे फक्त…”, भाजपच्या मंत्र्यानं सुनावलं

भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणं, त्या माध्यमातून लोकं, मतं आणि मतदारही विकत घेत हे जर निवडणुका जिंकायच्या. हे जर राजकारण असेल तर अशा राजकारणाला बाळासाहेब हे वेश्येचं राजकारण म्हणायचे. आणि आम्हाला असं राजकारण करायचं नाही.

यावेळी एकनाथ शिंदे यांना फार गांभीर्याने घेऊ नका, असा सल्ला देखील त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला. आम्हाला आव्हान देण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदाचा वाद सोडवावा, असा टोलाही त्यांनी हाणला. काल ते मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत, उद्या तेही राहणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Sharad Pawar : पालिका निवडणुका ठाकरे स्वबळावर लढवणार? शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया