Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रSushma Andhare : येथे न्याय विकत मिळतो...काय म्हणाल्या सुषमा अंधारे

Sushma Andhare : येथे न्याय विकत मिळतो…काय म्हणाल्या सुषमा अंधारे

Subscribe

साताऱ्यातील जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणानंतर शिवसेना - ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर चांगलीच टीका केली आहे.

मुंबई : साताऱ्यातील जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणानंतर शिवसेना – ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर चांगलीच टीका केली आहे. (shivsena ubt leader sushma andhare slams satara judge dhananjay nikam arrested while taking bribe by acb)

न्यायदानाच्या क्षेत्रात देखील आता भ्रष्टाचार घुसल्याचे दिसते आहे. खरं तर त्रासलेले नागरिक न्यायालयात न्यायाच्या अपेक्षेने येतात. पण या न्यायदानाच्या कामासाठी अधिकारी व्यक्तीकडून पैसे मागितल्याचा प्रकार साताऱ्यात समोर आला आहे.

संबंधित प्रकरणात एसीबी अर्थात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आली होती. त्यावरून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने एक सापळा रचला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम याच्यासह तिघांना एसीबीच्या पथकाने अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांचा खटला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या कोर्टात सुरू होता. फिर्यादीच्या वडिलांनी जामिनाची मागणी केली. मात्र, जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही लाच मागितल्याची तक्रार फिर्यादीने एसीबीकडे केली होती.

लाचखोरीचा हा आरोप खरा आहे की नाही, हे शोधण्यासाठी एसीबीने एक सापळा रचला होता. पाच लाख रुपयांच्या या लाचखोरी प्रकरणी एसीबीने न्यायाधीशाला पकडले. न्यायाधीशासोबतच आणखी काही लोकांना पकडले आहे. एसीबीने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून त्यावर कारवाई सुरू केली आहे. यावरूनच सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.

येथे न्याय विकत मिळतो असे सांगत अंधारे म्हणतात, नुसत्या धनंजय नावातच योगायोग थांबत नाही तर पुन्हा आडनावात निकम सुद्धा आहे… !! घ्या गोड मानून.. आता महाराष्ट्र थांबणार नाही, असे म्हणत अत्यंत शेलक्या शब्दात त्यांनी न्यायव्यवस्थेवर टीका केली आहे.

लाचखोरीसाठी एका न्यायाधीशालाच अटक होण्याची ही बातमी अत्यंत वेगाने सर्वत्र पसरली. आणि त्यावर उलट – सुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar