Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेणारे तकलादू...', उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका

‘स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेणारे तकलादू…’, उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका

Subscribe

जळगाव शहरातील सभेत विरोधकांवर सडकून टीका केली, स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेणारे तकलादू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपएसएस, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

जळगाव शहरातील सभेत विरोधकांवर सडकून टीका केली, स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेणारे तकलादू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपएसएस, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गुजरात मध्ये सरदार पटेलांचा उंच पुतळा उभारला, पण आज भाजपने तर नाहीच नाही पण त्यांच्या मातृसंस्थेनेदेखील आदर्श मानावं अशी व्यक्तीमत्व उभीच केली नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Shivsena UBT Leader Uddhav Thackeray Slams BJP And PM Narendra Modi In Jalgaon)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर जळगाव येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली.

- Advertisement -

“मधल्या काळात गुजरातमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांचा मोठा पुतळा उभारण्यात आला. हे सर्व चाळे सुरू आहेत, ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजेत. कारण आजपर्यंत कधीच भाजपाने आणि त्यांच्या मातृसंस्थेने आदर्श ज्यांना मानवं अशी व्यक्तीमत्वचं उभी केली. पण त्यांनी चोरीचं काम केलं. इकडे कोण वल्लभ भाई आहेत, घ्या चोरून.. इकडे कोण आहेत, नेताजी सुभाष घ्या चोरून.. आता तर माझे वडील चोरायला निघाले आहेत. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांच्या कुठेही संबंध नव्हता अशी लोकं हे आमचे.. हे आमचे.. असे सांगताहेत आणि त्यांच्या जोरावर दहीहंडी करत आहेत. कर्तृत्व काहीच नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला.

“सरदार वल्लभ भाई यांचा मोठा पुतळा उभारला. अरे तुम्ही वल्लभ भाईंचा 300, 400, 500, 1000 फूट उंच पुतळा उभारला. पण तुम्ही कितीही उंच पुतळा उभारला तरी, वल्लभ भाईंच्या कामाच्या उंचीच्या आसपास फिरकू शकत नाही”, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी हाणला.


- Advertisement -

हेही वाचा – मेंदू नावाचा प्रकार असावा लागतो, पण त्यांच्याकडे रिकामा खोका; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

- Advertisment -