Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 25 वर्षांत शिवसेनेची भाजप झाली नाही, तशी काँग्रेसही होणार नाही - उद्धव...

25 वर्षांत शिवसेनेची भाजप झाली नाही, तशी काँग्रेसही होणार नाही – उद्धव ठाकरे

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी त्यांनी भाजपासह शिंदे गटावर टीका केली. '१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी त्यांनी भाजपासह शिंदे गटावर टीका केली. ‘१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. त्याच्यानावावर लुटालूट करण्याचं काम सरकारचं सुरू आहे. वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा मुक्त केला. हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांनी रोखलं. मात्र भाजपकडून महापुरुष चोरले जातात’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. (Shivsena UBT Leader Uddhav Thackeray Slams BJP)

सत्ता आली काय गेली काय? मी सत्तेसाठी धडपडत नाही. देशाचं नेतृत्व करण्याची स्वप्न मला पडत नाही. जागं करण्याचं काम मला वंश परंपरेने आलं असल्याचं ठाकरे म्हणाले. ते पुढं म्हणाले की, सातत्याने टीका करण्यात येते की, शिवसेनेची काँग्रेस होईल. २५ वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत जावून शिवसेनाची काँग्रेस होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, हे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. तसंच त्यांनी तुम्ही देश सांभाळा. आम्ही महाराष्ट्र सांभाळू. पण त्यांना महाराष्ट्रही पाहिजे. जळगाव पाहिजे, औरंगाबादही पाहिजे. तुम्ही शिवसेनेला नख लावलं. तुम्ही आमचा विश्वासघात केला. आता आमच्या धगधगत्या मशालीची आग काय हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमचा नि:पात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारचा कोणताच अधिकृत माणूस बोलत नाही. एक दाढीवाला दिसतो. तो काय अधिकृत आहे काय? अरे जीव कशाला घेता जरांगे पाटील यांचा? असा सवाल करतानाच पंतप्रधानांना संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यात मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, असं आवाहन त्यांनी केलं.


- Advertisement -

हेही वाचा – ‘स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेणारे तकलादू…’, उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका

- Advertisment -