बुद्धी आणि मेंदु नावाचा एक कोणतातरी प्रकार असावा लागतो. पण त्यांच्याकडे ते नसून फक्त रिकामा खोका आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर जळगाव येथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली. यासभेत भाषणाच्या सुरूवातील उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. (Shivsena UBT Leader Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde In Jalgaon vvp96)
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“निवडणुका आलेल्या नाहीत कारण निवडणुका म्हटल्या प्रचाराच्या कोणत्याही वेळेला सभा घ्याव्या लागतात. आता दुपार असून ही वेळ सभेची नाही. छत्रपती शिवाज महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण तर झाले. पण तरीही तुम्ही इथे सभेला जमलात. अनेक कार्यक्रम होत असतात, पण त्यासाठी भाड्याने माणसं आणावी लागतात. मग त्या भाड्याची वेळ संपली की माणसं उठून निघून जातात. कोण बोलतंय, काय बोलतंय कोणाचं कोणाला काही नसतं. ते वाटतात आणि माणसं जमवात”, अशा शब्दांत भाषणाच्या सुरूवातील उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
“काही महिन्यांपूर्वी मी पाचोऱ्याला आलो होतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन माझ्याहस्ते करण्यात आले होते. त्याचवेळी मी जेव्हा हा पुतळा उभा राहिल तेव्हा त्याच्या अनावरणाला मी येणारचं असे वचन दिले होते. त्यामुळे मी एकदा वचन दिलं का विसरत नाही. कारण बाळासाहेबांची शिकवण नेहमी सांगते की शब्द देताना विचार कर एकदा नाही तर लाख वेळा विचार कर. कारण शब्द दिला तर प्राण जाईपर्यंत पडू द्यायचा नाही. त्यामुळे सहाजिकच तुम्ही या सभेला वचनपूर्ती सभा असे नाव दिले”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
“एककाळ असा होता की त्यावेळी जळगावने प्रगतीचा वेग पकडला होता. तसेच, भाजपा आणि शिवसेनेची युती असताना उमेदवार कोणीही असुदे तुम्ही मतदान करत आलात पण आता सगळी माणसं मोठी झाली असून त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि गॅसचे फुगे तरंगायला लागले. त्यामुळे त्यांना वाटतं की आम्हीच म्हणजे सगळं काही, पण या फुग्यांना टाचणी मारण्याचे काम तुमचं आहे. कारण ही कोणी मोठी माणसं नाहीत, तुम्हीच मोठी केलेली माणसं आहेत. तो प्रगतीचा वेग थांबला होता आणि आता जळगावातील तरुणपिढी पुढे नेत आहे”, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला.
“पण आता ही तरुणपिढी, महापौर ताईंचे भाषण खणखणीत झाले. अशा माणसांची गरज आहे. त्यातच तुम्हीही आहात. त्यामुळे आता कोण आढवं येतो ते पाहतो. त्यांच्यात बुद्धी आणि मेंदु नावाचा एक कोणतातरी प्रकार असावा लागतो. पण त्यांच्याकडे ते नसून फक्त रिकामा खोका आहे”, अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर केली.
हेही वाचा – राजशिष्टाचार आम्हाला शिकवायची गरज नाही…, ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले