BMC Election 2023 : आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक 2023च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. अनेक पक्षांचे पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. तसेच, जनतेची प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी घाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक 2023च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. अनेक पक्षांचे पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. तसेच, जनतेची प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी घाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. तसेच “ज्याची सत्ता आहे, ते वॉर्ड पुर्नरचना करणारच, त्यांना ती करू द्या, आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. (Shivsena Uddhav Thackeray Bmc Election 2023 Orders Officials To Be Ready)

मुंबई महापालिका निवडणूक 2023च्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी मुंबईत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, कामाला लागा, ज्याची सत्ता आहे, ते वॉर्ड पुर्नरचना करणारच, त्यांना ते करू द्या, आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरुया, सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागा”, असे आदेश दिले.

मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महापालिकेची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने मंगळवारी दिले आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला असून, सन २०११ च्या जनगणेनुसार प्रभागांची रचना निश्चित करून त्याचे प्रारूप करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिकेच्या आयुक्तांना केली आहे. त्यानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, मालेगाव, इचलकरंजी या २४ महापालिकांची मुदत संपली आहे.


हेही वाचा – श्रद्धाच्या पत्राची महाराष्ट्र पोलीसांनी दखल का घेतली नाही?, आशिष शेलारांचा सवाल