घरमहाराष्ट्रधरणग्रस्तांच्या पाठीशी सदैव उभा रहाणार - उद्धव ठाकरे

धरणग्रस्तांच्या पाठीशी सदैव उभा रहाणार – उद्धव ठाकरे

Subscribe

'राज्यात दुष्काळ आहे, धरणे सुकली आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना धरणाच्या आजूबाजूला येऊ देऊ नका' असा टोला, ठाकरे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

‘राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, इथे नवनवीन योजना आणि थापांचा नुसता पाऊस पाडला जात आहे. त्यांच्या गाजराच्या शेतीला मताचे पाणी टाकू नका’ अशी घणाघाती टीका, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांचे नाव न घेता केली. राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. ‘बारामतीमध्ये येऊन गुरू शिष्याचे नाते सांभाळणाऱ्या काकांचा राफेल घोटाळ्याला पाठिंबा आहे का?’ असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ‘राज्यात दुष्काळ आहे, धरणे सुकली आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना धरणाच्या आजूबाजूला येऊ देऊ नका’ असा टोला, ठाकरे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. ‘माझ्या सभांना जशी गर्दी वाढते आहे तशी माझी जबाबदारी वाढत आहे. हीच माझी ताकद आहे म्हणूनच आम्ही लढत आहोत. भगतसिंग, सुखदेव राजगरु ही शौर्याची प्रतिके व आपली दैवते आहेत.  राजगुरूनगर शहरात त्यांचे पुतळे बसवून या तीनही क्रांतिकारकांची प्रेरणा निर्माण झाली आहे. त्यांचे देशासाठीचे बलिदान कोणी विसरू शकणार नाही’, असंही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या हस्ते, आज राजगुरुनगरमध्ये हुतात्मा राजगुरु पुलाचे आणि हुतात्म्यांच्या स्मृतीशिल्पांचे लोकार्पण करण्यात आले


वाचा: उध्दव ठाकरेंच्या हस्ते, हुतात्म्यांच्या स्मृतीशिल्पांचे लोकार्पण

बैलगाडा बंदी का?

‘बैलगाडा शर्यतीवर बंदी घालणाऱ्यांनो एक लक्षात ठेवा तुम्ही बैलाला ‘बैल’म्हणता, आमचा शेतकरी त्याच बैलाला स्वतचं ‘पोरगं’ समजतो. बैलाचा मुलाप्रमाणे सांभाळ करतो. त्यामुळे बैलगाड्यांवर बंदी घालताना विचार करायला पाहिजे. जर बैलगाड्यावर बंदी घालायची असेल तर तुमच्या घोडा शर्यती बंद करा’, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला.
राजगुरुनगर येथील शेतकरी मेळ्यावासाठी जमलेले शेतकरी बांधव
”शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवणारच. केंद्र सरकारच्या माध्यमातून सीआरफच्या निधीतून राजगुरूनगर येथे भिमानदीवरील पूल बांधला व शहरातील पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला आहे. हुतात्मा राजगुरु यांच्या नावाने राजकारण केले जाते. त्यांच्या स्मारकासाठी कोणीच काही केले नाही.येथील महामार्गावरील त्यांचा पुतळा मागे घेऊन हुतात्मा भगतसिंग सुझाडेव्ही, राजगुरू या तीन क्रांतिकारकांचे पुतळे उभे केले.  केवळ खासदार झालो ते खेडमुळे याचे सारे  श्रेय खेड तालुक्याला आहे. हुतात्मा राजगुरू चे तिकीट प्रकाशन केले. ते  कुणाला जमले नाही हे काम मी केले.50 लाख रुपये निधी खासदार फंडातून खर्च करून हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांचे शिल्प उभे केले” – शिवाजीराव आढळराव, खासदार


डॉ बाबासाहेब आंबेडकरांचेही स्मारक होणार

‘भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या हुतात्मांच्या पुतळ्यांप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरही सुशोभीत केला जाईल. तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं याठिकाणी स्मारक उभारण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जाईल. राजगुरुनगर शहराचे वैभव वाढवेल असे बाबासाहेबांचे स्मारक करु’, अशी घोषणी खासदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -