Homeमहाराष्ट्रकोकणUddhav Thackeray : 40 वर्ष पक्षासोबत असलेल्या बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ;...

Uddhav Thackeray : 40 वर्ष पक्षासोबत असलेल्या बड्या नेत्यानं सोडली ठाकरेंची साथ; ‘ऑपरेशन टायगर’ला सुरूवात?

Subscribe

रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंना साथ दिली होती. परंतु, आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी : शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला पोखरण्याचं काम सुरू आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन ‘धनुष्यबाण’सह ऑपरेशन ‘टायगर’ राबवण्यात येणार आहे, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होते. त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरीतील अनेक ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी आज ( गुरूवार, 24 जानेवारी ) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी राजीनामा दिला आहे.

सचिन कदम हे शिवसेनेत 40 वर्षापासून आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतरही सचिन कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणे पसंत केले होते. मात्र, आता कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव आणि सचिन कदम यांच्यात संघर्ष होता. त्यामुळे कदम यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र, वैयक्तिक कारणामुळे पद आणि सदस्यत्त्वाचा राजीनामा देत आहे, असं कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : चुकून कारला धक्का, माजी उपमहापौराच्या मुलाकडून एकाला मारहाण अन्…; CCTV व्हायरल

अनंत गीते आणि विनायक राऊत यांचा विश्वासून कार्यकर्ता म्हणून सचिन कदम यांची ओळख आहे. परंतु, कदम यांच्या राजीनाम्यामुळे रत्नागिरीतील ठाकरेंच्या शिवसेनेते खळबळ उडाली आहे.

सचिन कदम हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाली आहे. पण, वैयक्तिक कारणामुळे पद आणि सदस्यत्त्वाचा राजीनामा देत आहे. सध्या कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं सचिन कदम यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, सचिन कदम काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. त्यानंतर गुरूवार उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे एक महत्त्वाचे विधान केले आहे. “बाळासाहेब ज्यापद्धतीनं लढले, तसेच मी लढणार आहे. ही लढाई, अर्ध्यात सोडून मैदान सोडणारा मी नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘अरे वेड्या, फडणवीसांनी पाच वेळा मातोश्रीवर येण्यासाठी वेळ मागितली, पण…’, कदमांनी ठाकरेंना फटकारलं