घरताज्या घडामोडीशिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार? संजय राऊत दिल्लीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीला

शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार? संजय राऊत दिल्लीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीला

Subscribe

महाराष्ट्राबाहेर शिवसेना पक्षाचा पहिला खासदार हा दादरा नगर हवेली येथे निवडून आला आहे. यानंतर आता शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत दिल्लीत दाखल झाले असून ते काँग्रेच्या बड्या नेत्यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी एनडीएतून बाहेर पडली आहे. यानंतर शिवसेना आता ना युपीएमध्ये किंवा एनडीएमध्येही नाही. मात्र आगामी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यादरम्यान संजय राऊत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतील. या भेटीमध्ये शिवसेनेच्या युपीए सहभागाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपुर्वीच शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. संजय राऊत मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतील त्यानंतर बुधवारी प्रियांक गांधींची भेट घेतील. प्रियांका गांधी लखनऊ दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची मंगळवारी भेट होणार नसल्याचे संजय राऊत यांनी यापुर्वीच सांगितले आहे.

- Advertisement -

युती तुटल्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर

राज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेनेची युती मुख्यमंत्री पदावरुन तुटली होती. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. भाजपकडून आश्वासन पाळलं गेलं नसल्यामुळे शिवसेना नेते अरविंद सांवत यांनी राजीनामा दिला आणि शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. तेव्हापासून शिवसेना यूपीए आणि एनडीएची भाग नाही.

ममतांनी युपीएवर साधला होता निशाणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी तिसऱ्या आघाडीवरुन काँग्रेस आणि युपीएवर निशाणा साधला होता. युपीए अस्तित्वातच नाही असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं होते. परंतु संजय राऊत यांनी बाजू सांभाळत काँग्रेशिवाय सक्षम आघाडी निर्माण होऊ शकत नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहेत. यावेळी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेली जवळीक स्पष्ट दिसून आली होती.

- Advertisement -

हेही वाचा :  ZP Election: जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूक, जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -