पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला अपघात; १० प्रवासी जखमी

accident
अपघात

सामान्य प्रवाशांना सुखकर, वातानुकुलित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी एस.टी. महामंडळाने अत्याधुनिक अशी शिवशाहीची बस आणली. मात्र, या अत्याधुनिक अशा शिवशाही बसेसचे बऱ्याचदा अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी रात्री उशिरा नाशिकवरुन पुण्याला निघालेल्या शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

असा घडला अपघात

पुणे- नाशिक महामार्गावर कळंब येथे रविवारी रात्री हा अपघात घडला आहे. शिवशाही बस (एम.एच.०६ बी.डब्लू. ०६४१) नाशिकवरुन पुण्याच्या दिशेने जात होती. दरम्यान, एका वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील अचानक ताबा सुटल्याने शिवशाही बस रस्त्यावर पलटी झाली. या बसमध्ये असणाऱ्या १० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाहतूक कोंडी

अपघातात बस पलटी झाल्यामुळे एक तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिवशाही बसला बाजूला करण्यात यश आले. मात्र, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


हेही वाचा – परतीच्या प्रवासासाठी रेल्वेला पसंती,चाकरमान्यांकडून अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी!