घरताज्या घडामोडीशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

Subscribe

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचं त्यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी सांगितलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कुटुंबीय रुग्णालयात दाखल झालं आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना न्युमोनिया झाला आहे. ते आता व्हेंटीलेटरवर आहेत. प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आलं आहे. प्रकृती अतिशय खालावली आहे, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी दिली.

- Advertisement -

बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित राजा शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती केली होती. त्याला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी सुरुवातीला शिवव्याख्याते म्हणून सुरुवात केली होती. त्यांच्या शिवचरित्राला अवघ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवला. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ ला झाला. सुरुवातीला त्यांच्या पुस्तकांवर हेच नाव असायचं, पण अवघा महाराष्ट्र त्यांना बाबासाहेब पुरंदरे याच नावाने ओळखतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -