घरताज्या घडामोडी...पण धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावलं

…पण धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावलं

Subscribe

माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ते उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या गटात शिवसेनेतील निष्ठावान कार्यकर्त्यांनाही वळवून घेतले आहे. तसेच, त्यांनी काल कार्यकारिणी जाहीर करून शिवसेनेवरच ते कब्जा मिळवत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा असं शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. ते उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. (Shivsnea uddhav thackeray attack on bjp)

हेही वाचामाझी भावना उद्धव ठाकरेंसोबत पण..,धैर्यशील मानेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

- Advertisement -

भाजपने शिवसेनेत फूट पाडली आहे. भाजपच सेनेला संपवत आहे. मात्र, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळालात तरी धनुष्य माझ्याकडेच आहे हे लक्षात ठेवा असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, ठाकरे संकटाला घाबरत नाहीत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करू, पुन्हा पक्ष नव्याने उभा करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेची साथ कधीच सोडणार नाही याची ग्वाही दिली. पदाधिकारी म्हणाले की, सध्या शिवसेनेचा काळ कठीण आहे. भगव्याचे निष्ठावंत शिलेदार एक एक करून तुमची साथ सोडत आहे. मात्र या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे आम्ही पदाधिकारी तुमच्यासोबत आहोत.

- Advertisement -

हेही वाचा – शिंदे गटातील खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत भेटीत चर्चा?

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजप दोन कोंबड्यामध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱ्याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. पण आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे. संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हे ही दिवस जातील, तोपर्यंत मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु.”

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -