घरCORONA UPDATEदुष्काळात तेरावा महिना; एसटी कर्मचाऱ्यांना बँकेकडून झटका

दुष्काळात तेरावा महिना; एसटी कर्मचाऱ्यांना बँकेकडून झटका

Subscribe

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चक्क शासनाने दिलेल्या सवलतीचा पैशांवर एसटी महामंडळाला आता अवलंबून राहावे लागत आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित पूर्णता बिघडले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चक्क शासनाने दिलेल्या सवलतीचा पैशांवर एसटी महामंडळाला आता अवलंबून राहावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून सभासदांना देण्यात येणाऱ्या रुपया निधी वर्गणीवरील व्याज मिळण्याची आशा होती. मात्र बँकेकडून फतवा काढत रुपया निधी वर्गणीवरील व्याज वाटपवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे दुष्काळात तेरा महिना सारखी परिस्थिती एसटी कर्मचाऱ्यांची झाली आहे. बँकेच्या निर्णयामुळे बँकेच्या सभासद असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बँकेचे परिपत्रक
बँकेचे परिपत्रक

एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक ही पगारदार आणि नोकरदाच्या बँकांमध्ये अग्रणीय बँक म्हणून गणली जाते. सद्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकच्या राज्यभरात ५० शाखा आहेत तर ११ विस्तार केंद्रे कार्यरत आहे. ८५ हजार एसटी कर्मचारी या बँकेचे सभासद आहे. एसटी कर्मचार्‍यांचे बहुतांशी व्यवहार या बँकेतून चालतात. एसटी बँकेच्या सभासदाकडून प्रत्येक महिन्याला एसटी बँकेकडे रुपया निधी वर्गणी जमा केली जाते. ३०० रुपये ते ८०० रुपयांपर्यत निधी एसटी कर्मचारी बँकेला देते. यावर एसटी बँकेकडून ८ टक्के व्याज सभासदांना दिले जाते.

- Advertisement -

व्याज चांगले मिळत असल्याने अनेक सभासदानी या निधीत जास्तीची रक्कम सुद्धा गुंतवली आहे. प्रत्येक वर्षी रुपया निधीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये एसटी बँकेकडे जमा होतात. यावरील व्याज प्रत्येक वर्षी १० मे ला कर्मचाऱ्यांना दिले जाते. यावर्षी ते ११ मे  ला दिले जाणार होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळाची आर्थिक डबघाईला आलेली आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाला शासनाचा सवलतीचा पैशांवर अवलंबून राहावं लागत आहे. त्यामुळे वेळेवर कर्मचाऱ्यांचे वेतन होत नाही आहे. यातच यात एक आशा म्हणून एसटीचे कर्मचारी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून मिळणाऱ्या रुपया निधी वर्गणीवरील व्याज मिळणार अशी आशा होती. मात्र शुक्रवारी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेने एक परिपत्रक काढत २०१९-२० या आर्थिक वर्षाचे ‘रुपया निधी’ या वर्गणीवरील व्याज वाटपाला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश सर्व शाखा व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे बँकेच्या सभासदांना मिळणारे रुपया निधीची व्याज रक्कम या संकट काळात मिळणार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संबंधित दैनिक आपलं महानगरने स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विकास जगताप यांच्याशी संपर्क केला असतां, संपर्क होऊ शकला नाही.

जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न

कोरोनामुळे महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही. या आर्थिक अडचणीत एसटी बँकेकडून मिळणाऱ्या रुपया निधी वर्गणीवरील व्याजेची रक्कम बँकेचा सभासदांना मिळणार होते. मात्र त्यावर तात्पुरती स्थगिती आणल्यामुळे कर्मचाऱ्यांची भ्रमनिरासा झाली आहे. अगोदरच एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन कमी आहे. एकदम हलाकीची परिस्थिती कर्मचारी जगतो आहे. त्यात बँकेवरचे नवीन संचालक मंडळ वारंवार चुकीचे निर्णय घेत आहे. रुपया निधी वर्गणीवरील व्याजेची रक्कम अदा करण्यावर स्थगिती आणल्यामुळे एक प्रकारे संकट काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याच काम बँकेवरच्या संचालक मंडळाने केले आहे. त्यामुळे बँकेवरचे संचालक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -