घरमहाराष्ट्रधक्कादायक! कोल्हापूरच्या कणेरी मठात ५२ गायींचा मृत्यू

धक्कादायक! कोल्हापूरच्या कणेरी मठात ५२ गायींचा मृत्यू

Subscribe

कोल्हापूर – जिल्ह्यातील कणेरी मठात पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. मात्र, या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या ठिकाणी असलेल्या गोशाळेत तब्बल ५२ गायींचा मृत्यू झाला आहे. गोशाळेतील या देशी गायींना कालचे शिळे अन्न् खायला घातल्याने या ५२ गायी दगावल्या असून आणखी ३० गायींना विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोल्हापुरातील कणेरी मठात पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. या मठात देशभरातील हजारो नागरिक येत असतात. येथे जनावरांचं प्रदर्शनदेखील भरवण्यात आलं आहे. मठात देशी गायींची भव्य गोशाळा आहे. या गोशाळेतील गायींना शिळे अन्न खाऊ घातल्याने ५२ गायींचा मृत्यू झाला आहे. तर, ३० गायींना विषबाधा झाली आहे.

- Advertisement -

या ३० गायींवर गोशाळेत उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गायींवर उपचार सुरू झाले आहेत. परंतु, मृत गायींचा अधिकृत आकडा सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, गायींचे पोस्टमार्टम होणार असून तपास केला जाणार आहे.

एका ठिकाणी हजारो भाकरी आणि चपात्यांचा ढीग लागला होता. हे अन्न वाया जाऊ नये याकरात येथील गायींना खाऊ घालण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. काल प्रकार काल रात्री झाला असून मृत गायींना पुरण्यात येत आहे.

- Advertisement -

देशी गायींचे प्रदर्शन

श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनामुळे देशी जाती-प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार असल्याचीही यामध्ये माहिती देण्यात आली. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा देखील ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी 69 लाखांची बक्षिसे देण्यात येतील. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना 21 हजारांपासून ते लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येतील.

सेंद्रिय शेतीसाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा – सेंद्रिय शेतीसाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -