घरCORONA UPDATELockDown : गेल्या चार महिन्यात रायगड जिल्ह्यात ६५ जणांच्या आत्महत्या

LockDown : गेल्या चार महिन्यात रायगड जिल्ह्यात ६५ जणांच्या आत्महत्या

Subscribe

कोरोनमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या जीवनावरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आर्थिक आणि मानसिकरित्या खचलेल्यांना आत्महत्येचे घेरले असून शारीरिक व्याधींना कंटाळलेल्यांनीही मृत्युला कवटाळले आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात ६५ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोरोनमुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढले असून घरखर्च कसा चालवायचा अशी चिंता अनेकांना भेडसावू लागली आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि नैराश्य वाढण्यास सुरूवात झाली आहे. यातून आत्महत्येसारखी टोकाची पाऊले उचलले जात आहे.

गेल्या चार महिन्यात रायगड जिल्ह्यात ६५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. मार्चमध्ये १५, एप्रिलमध्ये ११, मेमध्ये २४ तर जूनमधील १५ आत्महत्यांचा यामध्ये समावेश आहे. या आत्महत्यांमागची कारणे वेगवेगळी असली लॉकडाऊनमधील परिस्थिती हा समान धागा आहे. त्यामुळे नागरिकांनी मानसिक ताणतणावांचे योग्य व्यवस्थापन करणे, सकारात्मक जीवनशैली आत्मसात करणे, गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार घेणे आवश्यक आहे. कोरोनामुळे नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मानसिक तणाव वाढत आहेत. नागरिकांनी भीती न बाळगता त्याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

पायलट यांनी दिली होती ३५ कोटींची ऑफर; काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -