धक्कादायक! सांगलीत दिवसाढवळ्या भाजपा नगरसेवकाची हत्या

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली – सांगलीत दिवसाढवळ्या भाजपा नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. सांगलीतील जत तालुक्यात हा थरार झाला असून विजय ताड असे हत्या झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सांगोला रोडवर असलेल्या शाळेत आपल्या मुलांना आणायला जात होते. यावेळी विजय ताड यांच्या पाठून काही लोक पाठलाग करत येत होते. अल्फान्सो शालेजवळ पोहोचले असता ताड यांची गाडी हल्लेखोरांनी अडवली. गाडी अडवल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दिवसाढवळ्या झालेल्या या थरारामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या हल्ल्यामागचं कारण समोर आलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे.