घरमहाराष्ट्रपुणेधक्कादायक! चिंचवडमधून भाजपाने दोघांना उमेदवारी दिली, पण नेमकं कारण काय?

धक्कादायक! चिंचवडमधून भाजपाने दोघांना उमेदवारी दिली, पण नेमकं कारण काय?

Subscribe

Chichwad Byelection | लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप यांनीही भाजपामधून या जागेवरून अर्ज भरला आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे कार्यकर्ते गोंधळात पडले असून खळबळ उडाली आहे.

Chichwad Byelection | पिंपरी-चिंचवड – चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्याने या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या जागेवरून भाजपाकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनीही भाजपामधून या जागेवरून अर्ज भरला आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे कार्यकर्ते गोंधळात पडले असून खळबळ उडाली आहे.

हेही वाचा कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी लढणार निवडणूक, पुण्यात मविआविरुद्ध भाजप

- Advertisement -

अश्विनी जगताप यांनी भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी मोरया गोसावीचं दर्शन घेऊन प्रचारालाही सुरुवात केली. त्यांचा प्रचार ऐन भरात आलेला असतानाच लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप यांनीही उमेदवारी अर्ज भरला असल्याचं समोर आलं आहे. तेसुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु, आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोणाला पाठिंबा द्यायचा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा गोंधळ दूर करण्याकरता भाजपाने याबाबत खुलासा केला आहे. शंकर जगताप यांचा अर्ज डमी अर्ज असल्याची माहिती भाजपा नेत्यांकडून देण्यात आली आहे. अर्ज छाननीत अश्विनी जगताप यांचा अर्ज बाद झाला तर भाजपाची अडचण होऊ नये म्हणून लक्ष्मण जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे असं सांगण्यात आलंय.

चिंचवडमध्ये उमेदवारीवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत धुसफूस सुरु होती. परंतु रविवारी सायंकाळी शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर चिंचवडच्या जागेवर राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याचं घोषित करण्यात आलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कलाटे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आश्विनी जगताप विरुद्ध राहुल कलाटे असा सामना आता पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

कसब्यातून काँग्रेस लढवणार

कसबा पेठ निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धीरज घाटे, गणेश बीडकर, शैलेश टिळक, कुणाल टिळक आणि हेमंत रासने यांनी प्रयत्न केले होते. परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा वापर करत हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज उमेदवारांचा फटका भाजपला सहन करावा लागणार आहे. यात काँग्रेसने कसब्यातून गेल्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार अरविंद शिंदे यांना डावलत रविंद्र धंगेकर यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 26 फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या दोन्ही निवडणुकांचा निकाल 2 मार्चला जाहीर होणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -