Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र धक्कादायक! औरंगाबादेत भीक मागण्यासाठी दीड लाखांत विकत घेतली दोन मुलं

धक्कादायक! औरंगाबादेत भीक मागण्यासाठी दीड लाखांत विकत घेतली दोन मुलं

औरंगाबादेत एका भीक मागणाऱ्या महिलेने दोन मुलं दीड लाखात खरेदी करून भीक मागण्यासाठी बसवलं

Related Story

- Advertisement -

भीक मगणाऱ्या एका महिलेने दोन चिमुकल्यां दिड लाख रुपयांना विकत घेऊन बिक मागण्यास बसवल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद मध्ये घडला .पोटच्या आईकडूनच १०० रुपयांच्या बाँडवर व्यवहार केला गेला .या मध्ये एक पाच वर्षांचा, तर दुसरा दोन वर्षांचा मुलगा असल्याचे समजते .माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून जन्मदात्या आईने हेरून टाकणार असा हा व्यवहार केला आहे.

भीक मागणाऱ्या महिलेने भीक मागण्यासाठी दोन मुलं दीड लाखात विकत घेऊन त्या चिमुकल्यां भीकमागायला लावलं. मुलांनी हे काम न केल्यास महिला त्यांनी जबर मारहाण करत असे असल्याचं देखील समोर आलं आहे. तसेच रात्री बाथरूमध्ये झोपायला लावत होती आणि तासनताल पाण्यात बसवून ठेवत होती असे हि समजले आहे.या लहान मुलांच्या छळाची माहिती मुकुंदवाडी रामनगर भागात राहणाऱ्या समाजसेवक देवराव विर यान समजली.त्यांनी प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि मुकुंदवाडी पोलिसांनी मुलं विकत घेणाऱ्या एका महिलेला आणि आपलीच पोटाची मुलं विकणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

- Advertisement -

मुलांना कुटुंबाबाबत माहिती विचारली असता आजी-आजोबा अकोल्याला, तर आई-वडील देऊळगावात राहत असल्याचे त्याने सांगितले या वेळी भीक मगणाऱ्या महिलेने मुलं दत्तक घेतल्याचं दावा कला आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत

- Advertisement -