घरक्राइमनांदेडमध्ये ऑनर किलिंग! नात्यातील मुलासोबत प्रेमसंबंध, वडील-भावाकडूनच डॉक्टर तरुणीची हत्या

नांदेडमध्ये ऑनर किलिंग! नात्यातील मुलासोबत प्रेमसंबंध, वडील-भावाकडूनच डॉक्टर तरुणीची हत्या

Subscribe

Honor Killing in Nanded | गावात नाचक्की झाल्याने तिच्या कुटुंबियांनीच तिची हत्या केली आहे. ही मुलगी वैद्यकीय शिक्षण बीएएमएसच्या (BAMS) तिसऱ्या वर्षात शिकत होती. हत्या केल्यानंतर तिच्या शरीराची राख बाजूच्या ओढ्यात फेकून दिली.

Honor Killing in Nanded | नांदेड – ऑनर किलिंगच्या घटनेमुळे नांदेड जिल्हा हादरला आहे. आपल्या मुलीचे नात्यातील मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने तिचे दुसऱ्यासोबत जमवलेले लग्न मोडले. यामुळे गावात नाचक्की झाल्याने तिच्या कुटुंबियांनीच तिची हत्या केली आहे. ही मुलगी वैद्यकीय शिक्षण बीएएमएसच्या (BAMS) तिसऱ्या वर्षात शिकत होती. हत्या केल्यानंतर तिच्या शरीराची राख बाजूच्या ओढ्यात फेकून दिली.

शुभांगी जोगदंड ही २३ वर्षी तरुणी नांदेड जिल्ह्यातील पिपंरी माहिपाल येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. ती बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात होती. तेव्हा तिचे गावातील तिच्या आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र, तिच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता. म्हणून, तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे जुळवले. मात्र, मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती सासरच्यांना कळल्याने त्यांनी ठरलेले लग्न मोडलं. यामुळे गावात नाचक्की झाल्याची भावना पीडित मुलीच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झाली. याच खोट्या प्रतिष्ठेपायी भाऊ आणि वडिलांनी तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांनीच जाळून टाकला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची राख शेजारच्या ओढ्यात नेऊन टाकली.

- Advertisement -

हेही वाचा – ऑनर किलिंग…जीवघेण्या प्रतिष्ठेमागील जातवास्तव!

गेल्या तीन दिवसांपासून आपली मैत्रीण कुठेच दिसत नसल्याने शुभांगीच्या मैत्रीणींनी याबाबत राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यांनी तत्काळ पावलं उचलल्यामुळे या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपासाला सुरुवात केली असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुलीचे वडील, भाऊ, मामा आणि दोन चुलतभाई यांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा जालन्यात ऑनर किलिंग! पळून जाऊन लग्न केल्यामुळे बापानं केली मुलीची हत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -