घरताज्या घडामोडीधक्कादायक : कोरोनामुक्त तरुणाला फोन करुनी दिली त्याच्याचं मृत्यूची माहिती, यंत्रणेचा ढिसाळ...

धक्कादायक : कोरोनामुक्त तरुणाला फोन करुनी दिली त्याच्याचं मृत्यूची माहिती, यंत्रणेचा ढिसाळ कारभार उघड

Subscribe

उपचार केलेल्या रुग्णालयाकडून मृत यादीत नाव

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही वाढ झाली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अटोक्यात आल्यामुळे रुग्ण आणि मृत्यू संख्या कमी झाली आहे. परंतु मृत्यूचे ऑडिट करत असताना कोरोनामुक्त तरुणाच्या फोनवरच फोन करुन ताच्याच मृत्यूची माहिती दिली गेल्यानं साताऱ्यात खळबळ माजली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तरुणाने मे महिन्यात कोरोनावर मात केली असून सध्या तो घरी विश्रांती घेत आहे. परंतु रुग्णालयातील मृत्यूच्या यादीमध्ये तरुणाचे नाव ४६ व्या क्रमांकावर असल्यानं कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

साताऱ्यातील फलटणमधील मंगळवार पेठेत राहणाऱ्या सिद्धांत भोसलेला (२०) रुग्णालयानं मृत घोषित केलं आहे. मृत्यूचे ऑडिट सुरु असताना मृतांच्या घरी फोन करुन माहिती घेण्याचं काम सुरु होतं. रुग्णालयातील परिचारिकेनं सिद्धांतच्या फोनवर फोन करुन सिद्धांतचा मृत्यू झाला आहे तर त्याला आणखी काही आजार होते का ? असा प्रश्न करत सिद्धांतबाबत माहिती विचारली. मलाच माझ्या मृत्यूची माहिती कशी काय देतायं असे म्हणत सिद्धांतने आपल्या आईकडे फोन दिला. परिचारिकेने आईलाही त्याच्या मृत्यूची माहिती देत प्रश्न विचारले यावरुन सिद्धांतची आईने संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर सिद्धांतच्या आईने रुग्णालयाच्या दिशेने पोबारा केला आणि फलटण ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकेसोबत संवाद साधला. यावेळी जी गोष्ट निदर्शनास आली त्याने सिद्धांतच्या कुटुंबीयांना धक्काच बसला चक्का सिद्धांतचे नाव मृतांच्या यादीत ४६ व्या क्रमांकावर होते. सिद्धांत स्वतः रुग्णालयात गेल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काच बसून त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

उपचार केलेल्या रुग्णालयाकडून मृत यादीत नाव

सातारा जिल्ह्यातील फलटमधील भोकरे दवाखान्यात सिद्धांत कोरोनावरील उपचार घेत होता. ७ मे रोजी दाखल झाल्यावर उपचारानंतर सिद्धांतला ११ मे रोजी घरी सोडण्यात आले होते. परंतु या रुग्णालयातच सिद्धांतचे नाव मृतांच्या यादीत नोंदविले असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. परंतु ग्रामीण रुग्णालयातील यादीमध्ये सिद्धांतच्या मृत्यूची नोंद कशी करण्यात आली याबाबत अद्याप काही माहिती देण्या आली नाही.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -